शिक्षण घेता येत नसल्याचे दुःख; एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न

शिक्षण घेता येत नसल्याचे दुःख; एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न

Man leaning with hands against wall, dark room

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या तुटपुंज्या पगारामुळे कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल होत असून अनेक कर्मचारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून २५ हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून नाशिकमधील मालेगाव येथील एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने वडिलांच्या कमी पगारामुळे मनाजोगते शिक्षण घेता येत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मालेगाव आगारात चालक म्हणून सेवा बजावणारे शिवदास शिंदे यांच्या मुलाने वडिलांच्या कमी पगारामुळे त्याला त्याच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित प्रकार समजताच मुलाला तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

ऊस ‘पिळून’ वीज बिल काढल्याबद्दल टीकेची झोड

तजामुल इस्लामची ‘सुवर्ण किक’

अखेर आर्यन खानची दिवाळी मन्नतवर!

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले असूनएसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. महागाई भत्ता, घरभाडे आणि पगार यासह इतर मुद्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. राज्य सरकारने २८ ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली होती.

अहमदनगरमध्ये काल एका एसटी कर्मचाऱ्याने आगारात उभ्या असलेल्या बसला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आर्थिक कोंडीला कंटाळून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असून दुर्दैवाने आता कुटुंबियांनाही असे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.

Exit mobile version