मिळाला एका महिन्याचा पगार तोही ९८००; काय करावे एसटी कर्मचाऱ्याने?

मिळाला एका महिन्याचा पगार तोही ९८००; काय करावे एसटी कर्मचाऱ्याने?

अहमदनगर जिल्ह्यातील एसटी बसचे वाहक अंबादास गोयेकर यांना दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे ते नैराश्येत गेले होते. या महिन्यात त्यांना केवळ ९,८०० रुपये वेतन देण्यात आले. त्यांच्या आईच्या कोरोनावरील उपचारासाठी इतके पैसे पुरेसे नव्हते. अजूनही ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळणं बाकी आहे. आमच्यापैकी अनेकांनी जगण्यासाठी कर्ज घेतले आहे. हे सर्व कधी थांबणार आहे. लाख कर्मचाऱ्यांमधून आत्महत्या रोखू शकतो का, असे प्रश्न गोयेकर यांनी विचारले आहेत.

मागील वर्षी एसटी महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. एक रत्नागिरीतील बस चालक होते; तर दुसरे जळगावमधील वाहक होते. त्यांच्या आत्महत्येनंतर सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एक हजार कोटी रुपये देऊ केले होते. यावर्षीही धुळे येथील एका एसटी बस चालकाने आत्महत्या केल्यावरच सरकारने ५०० कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील वेतनासाठी दिले आहेत.

हे ही वाचा:

बेळगावात कमळाला कौल; शिवसेनेचे समर्थन असलेले उमेदवार पराभूत

गाडी पुण्यात; दंड मुंबईत!

लोकप्रिय कलाकार घेतायत ८० हजार ते दीड लाख रोज

सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी

या समस्येवर आता कायमस्वरूपीचा तोडगा निघणे आवश्यक आहे. ज्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला आमच्या बँक खात्यात आमचे वेतन जमा होईल. यावर उपाय म्हणजे एसटी महामंडळाला राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रात विलीन करणे, असे गोयेकर यांनी सुचवले. कर्जत मध्ये घर असून बँकेकडून कर्ज घेतले आहे. अशीच अनेक चालकांची परिस्थिती आहे. कोरोना काळातही वेतन विलंबाने मिळाल्यामुळे ९० टक्के कर्मचाऱ्यांनी घर चालवण्यासाठी कर्ज घेतले आहे, असे एसटी बस चालक सुरेश पाटील यांनी सांगितले.

महामंडळाला वेतन देण्यासाठी म्हणून सरासरी ३०० करोड रुपयांची गरज लागते. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. सरकारला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे देण्याची विनंती केली आहे. कोरोना महासंकटात एसटीच्या चालकांनी आणि वाहकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली, तेव्हा त्यांना वेळेवर त्यांचे वेतन मिळायला हवे. ८४ कर्मचाऱ्यांनी प्राणही गमावले; तरीही लाखोंची सेवा केली, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version