27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषनाशिककरांची ८ तारीख ठरली 'अपघाताची'

नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’

नाशिकमध्ये परिवहन सेवेच्या दोन बस गाड्यांचा अपघात

Google News Follow

Related

नाशिकमध्ये ८ ऑक्टोबर रोजी तपोवन येथे बसला आग लागून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज डिसेंबर ८ रोजी असाच विचित्र अपघात नाशिकपासून ६ ते ७ किमीवर असलेल्या शिंदे पूलाजवळ झाला आहे. सुदैवाने स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना एस.टी बसमधून बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातात एसटी बस खाली चिरडले गेलेले २ दुचाकीस्वार जागीच ठार झाले. तर एसटी बसमधील ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. थोडाही विलंब झाला असता तर या अपघातात बसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. हा अपघात आज दुपारी १२ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

राज्य परिवहन महामंडळाची एमएच १४ बीटी ३६३५ पुण्याच्या राजगुरूनगर आगाराची बस राजगुरूनगर हुन नाशिकला  निघाली होती. नाशिक शहरानजीक असलेल्या शिंदे टोल नाका परिसरात बस येताच चालकांना ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. याचवेळी गतिरोधक असल्याने अनेक वाहनांचा वेग कमी झाला होता. मात्र ही बस थेट पुढे एसटीच्या साध्या बसला धडकली. मात्र याचवेळी नाशिकडे जात असलेल्या दोन दुचाकीस्वार या गाडीखाली आल्याने चिरडून मृत्यू झाला. तर यात दुचाकीची पेट्रोल टाकी फुटल्याने दुचाकीसहा बसला आग लागली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यापूर्वी दोन बस एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला होता. या आवाजामुळे स्थानिक नागरिक व दुकानदारांनी बसच्या दिशेने धाव घेतली. यावेळी पुण्याहून आलेल्या बसमध्ये ४३ प्रवासी होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी बसचा दरवाजा, खिडक्या, मागील दरवाजा तोडण्याचा आटोकाट प्रयत्न तिथे उपस्थित असणाऱ्यांनी केला. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले.

बस चालकाशी संवाद साधा

दरम्यान, बसचालक राजेंद्र अंबादास उईके, राजगुरुनगर-नाशिक बसमधील महिला कंडक्टर आशा शेळके हे दोघे सुखरूप आहेत. पळसे चौफुली बसस्थानकाजवळ वेगमर्यादा पाहून मी बसचा ब्रेक दाबला, मात्र बसचा ब्रेक न लावल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि बस समोर उभ्या असणाऱ्या एसटीच्या बसवर आदळली, अशी माहिती बसचालक राजेंद्र उईके यांनी प्रसारमध्यमानशी बोलताना सांगितले.

हे ही वाचा :

हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव

आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका

भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी

ऑक्टोबर महिन्यातही अशाच प्रकारे खाजगी बस जळली होती विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात नाशिक शहराजवळील औरंगाबाद महामार्गावर तपोवन येथे खासगी बसचा असाच अपघात झाला होता. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता. सुदैवाने आज या घटनेची पुनरावृत्ती टळली. मात्र या घटनेची भीषणता आणि तीव्रता दिसून येते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा