अयोध्येत राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या एका सुरक्षा दलाच्या जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. जवानाला गोळी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरु आहे. गोळी लागल्यानंतर जवानाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी जवानाला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी जवानांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून याचा अहवाल समोर आल्यानंतरच या प्रकरणाची माहिती समोर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. व्हीआयपी गेटवर हा जवान तैनात होता. अचानक गोळीबाराच्या आवाजाने राम मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. शत्रुघ्न विश्वकर्मा असे गोळी लागू मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. तो आंबेडकर नगर येथील काजपुरा गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा..
पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!
कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शोधताहेत भारत संबंधांमध्ये ‘संधी’
दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी जवानाला तपासून मृत घोषित केले. या घटनेचा तपास पोलीस अधिक तपास करत आहेत.