दहावीच्या विद्यार्थांच्या अभ्यासाचा खेळखंडोबा तर झालाच. पण आता खरी कसरत शाळांची आहे. त्यामुळेच शाळांनाही असंख्य दिव्यातून आता जावे लागणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र (एसएससी) साठीच्या मूल्यांकन प्रक्रियेस आणखी काही वेळ लागू शकतो. कारण शाळा अजूनही त्याचा आराखडा तयार करण्याच्या कामात आहेत. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी जूनअखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे निकाल जुलैच्या मध्यापर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
पाकीटमारांना सापडले हिरे, पण हाती पडल्या बेड्या… कशामुळे?
केंद्राकडे केलेल्या ७-८ मागण्या तर राज्याशी संबंधित
ढकललं केंद्रावरचा दिल्लीत प्रयोग
छे ! छे !! उद्धव ठाकरे अजिबात वाकले नाहीत…
राज्य मंडळ लवकरच आपापल्या प्रभाग मंडळांना शाळांकडून गुण देण्याचे वेळापत्रक जाहीर करेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले की शाळांना लवकरच सूचनांचे एक संच प्राप्त होतील आणि त्या आधारे ते त्यांचे संकलन सुरू करू शकतील. आम्हाला आशा आहे की, परिणामी जुलैच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर केला जाईल.”
एसएससी परीक्षा रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे सूत्र तयार केले.
२८ मे रोजी राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करून मूल्यांकन पद्धतीने निकाल लावला जाईल असे जाहीर केले. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २५ हजार ९२७ शाळा असून एसएससी परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. मूल्यमापनासाठी सध्या एक योजना तयार केली असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना मूल्यांकन पध्दतीबद्दल सर्व विभागीय मंडळांना सूचनाही दिल्या आहेत, असेही यावेळी ते म्हणाले.