वेबसाईट हँग; दहावीची मुले त्रासली

वेबसाईट हँग; दहावीची मुले त्रासली

कोरोनामुळे आधीच पिचलेल्या दहावीच्या मुलांना ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेचा निकालानंतरही त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी दहावीच्या मुलांचा निकाल जाहीर झाला पण त्यासाठी दिलेली वेबसाईट तब्बल चार तास हँग झाली. त्यामुळे मुलांना आपले निकालच पाहता आले नाहीत.

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला.  मात्र हा निकाल जाहीर होऊन चार तास लोटले तरी निकाल पाहणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. कारण दुपारी १ वाजताच बोर्डाची वेबसाईट हँग झाली. तसेच एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नव्हता.

अचानक वेबसाईट्सचे यूजर वाढल्यानं ही साईट हँग झाल्याची माहिती देण्यात येत होती. मात्र चार तास झाले तरी वेबसाईट सुरु होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. वेबसाईट कधी सुरू होईल, याची अधिकृत माहिती बोर्डाने अजूनही दिली नाही.

यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पण या मुलांना उत्तीर्ण कसे करणार, हा प्रश्न होता. अखेर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मुलांना गुण दिले जातील असे निश्चित करण्यात आले. त्यालाही बराच विलंब होत होता. त्यामुळे जुलैच्या अखेरीस निकाल लागणार की काय अशीही शंका होती. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यावर ही परीक्षा व्हायला हवी होती असा एक मतप्रवाह होता. परीक्षा रद्द केल्यावर मुलांना गुण कसे देणार यावरून चर्चा सुरु झाली. त्यातही बराच गोंधळ उडाला.

हे ही वाचा:

काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्वच नको

रस्त्यावरील टोमॅटोंमुळे वाहतूक खोळंबली तब्बल ५ तास

दहावीचा निकाल ९९.९५ टक्के; मग ७५८ मुलांचे काय झाले?

उद्धव ठाकरेंना ‘बेस्ट सीएम’ ठरवण्यामागे काँग्रेसचा हात?

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारच्या या कारभारावर ट्विट करत सडकून टीका केली आहे. ते म्हणतात की, ठाकरे सरकार हँग झालंय.. त्यामुळे एसएससीच्या निकालाची वेबसाईट ‘हँग’ली तर नवल ते काय? ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीच घेतलेली दिसतेय.

Exit mobile version