दहावी निकालात कोकण ९९.२७ टक्के

दहावी निकालात कोकण ९९.२७ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार, १७ जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेत यंदा ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यंदाच्या वर्षी मुलींनी बाजी मारली असून निकालाचा टक्का ९७.९६ आहे. तर २०२० च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून ९९.२७ टक्के निकालासह कोकण पहिल्या क्रमांकावर आहे. ९५.९० टक्के निकाल नाशिक विभागाचा लागला असून यादीत सर्वात कमी आहे. यंदा एकूण १५ लाख ६८ हजार ९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीसह ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. तब्बल १२ लाख २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, लातूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी हा २० जून ते २९ जून आहे.

हे ही वाचा:

राजस्थानच्या मुख्यमंत्र्याच्या भावाच्या घरी सीबीआयचे छापे

पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!

अग्निपथ योजनेसाठी केंद्र सरकारने वाढवली वयोमर्यादा

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

विभागांचे निकाल 

मुंबई: ९६.९४%

पुणे: ९६.१६%

कोकण: ९९.२७%

नाशिक: ९५.९०%

औरंगाबाद: ९६.३३%

अमरावती: ९६.८१%

नागपूर: ९७.००%

कोल्हापूर: ९८.५०%

लातूर: ९७.२७%

Exit mobile version