कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे तयार होणारा दहावीचा निकाल अखेर शुक्रवारी जाहीर झाला. या ९९.९५ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. ०.०५ टक्के म्हणजेच ७५८ मुलं अनुत्तीर्ण झाली आहेत पण ती अनुत्तीर्ण का झाली, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कोकणाने दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. या विभागातील १०० टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. नागपूरचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९९.८४ टक्के लागला आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा हा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.
राज्यातील नऊ विभागांचा मिळून निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. यापैकी कोकण विभागाचा १०० टक्के, अमरावती ९९.९८ टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के आहे. यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतून ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली असे एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसले होते. लेखी परीक्षेचे आयोजन २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत करण्यात आले होते, पण कोरोनामुळे त्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. इयत्ता १०वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुण आवश्यक असतात, मात्र अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर २० टक्के गुण मिळणारे विद्यार्थीही उत्तीर्ण झाले आहेत.
हे ही वाचा:
कुणी घर देतं का घर! म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा
उद्धव ठाकरेंना ‘बेस्ट सीएम’ ठरवण्यामागे काँग्रेसचा हात?
लसींसाठी सरकार खर्च करणार आणखी १४ हजार कोटी; किती मिळणार लशी?
अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा
राज्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळांकडून प्राप्त झाले. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाली.