27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा पास करणार?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा पास करणार?

Google News Follow

Related

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबात कोणताही निर्णय झालेला नाही. त्या संदर्भातील परीक्षांबाबत चर्चा बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील पास केलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले गेले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती.या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित होते.  राज्यात शनिवारी आणि रविवारी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या शनिवारच्या पेपरच काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:

दोषींवर कारवाई करा किंवा मला फाशी द्या

न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नावावर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर

लोकांनी कसं वागावं हे सांगता ते स्वतः कधी वागणार- राज ठाकरेंचा सवाल

गृहमंत्री पद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे

नववी आणि अकरावी परिक्षेबाबात ऊद्या संध्याकाळी निर्णय होणार आहे. तर, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय पाच दिवसांनंतर होणार आहे. पहिली ते आठवी प्रमाणे या मुलांनाही पास केलं जाईल, अशी माहिती मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील प्रमोट करावं अशी मागणी केली होती.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केले जाणार आहे. तर नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा