३० डिसेंबर रोजी श्रीराम विमानतळ अन् अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार सोहळा

३० डिसेंबर रोजी श्रीराम विमानतळ अन् अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेपूर्वी डिसेंबरमध्ये अयोध्येत दाखल होण्याची तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान मोदी ३० डिसेंबरला अयोध्येला येणार आहेत. याच दिवशी मोदी यांच्या हस्ते श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्याधाम जागतिक रेल्वे स्थानकासह अन्य सुविधांचेही लोकार्पण होणार आहे.

 

अयोध्येचे खासदार वेद प्रकाश गुप्त यांनी ही माहिती दिली. अयोध्या हे जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून साकारले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबर रोजी देशातील सर्वांत सुंदर विमानतळ आणि रेल्वे स्थानकासह अन्य मोठ्या उपक्रमांचेही लोकार्पण करतील, असे गुप्त यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच सर्वाधिक विरोध केला

हार्दिक कर्णधार झाला आणि मुंबई इंडियन्सने गमावले पाठीराखे

मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर, दीपक चहरची वनडेतून माघार

लोअर परळ येथील सहकारी पतपेढीच्या अध्यक्षासह १५ जणांविरुद्ध गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील अयोध्या नगरीला एक विशिष्ट धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख देण्यासह पर्यटन शहर म्हणूनही विकसित केले जात आहे. विमानतळ आणि अयोध्याधाम रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर येथे आर्थिक प्रगती आणखी नवे उड्डाण घेईल. त्याचा लाभ सर्व अयोध्यावासींना होईल. पंतप्रधान मोदी अयोध्येहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचीही सुरुवात करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

लखनऊमध्ये २० ते २३ जानेवारी हॉटेलांची ऍडव्हान्स बुकिंग नाही

अयोध्येमध्ये होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर २० जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत लखनऊच्या हॉटेलांमध्ये आगाऊ बुकिंग होणार नाही. लखनऊ हॉटेल असोसिएशनसोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्य गृहसचिव संजय प्रसाद यांनी याबाबत सूचना केल्या. हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे. पाहुण्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त शुल्काची वसुली करू नये, अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत.

Exit mobile version