पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून पाकिस्तानच्या लष्कराला बळ पुरवले जात आहे. भारतासोबत सीमावाद सुरू असतानाच चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या लष्करासाठी स्टीलचे बंकर बनवले जात आहेत. तसेच, चीनकडून पाकिस्तानला मानवरहित लढाऊ विमान पुरवले जात असून अन्य लष्करी साहित्याचा पुरवठाही केला जात आहे.
चीनच्या मदतीने पाकिस्तानमध्ये उच्च दर्जाच्या संपर्क यंत्रणेचे टॉवर उभारले जात आहेत. भूमिगत फाइबर केबलही अंथरण्याचे काम जोरात सुरू आहे. चिनी बनावटीची अतिप्रगत अशी रडार यंत्रणाही बसवली जात आहे. या रडारच्या माध्यमातून पाकिस्तानी लष्कराला कमी उंचीचे लक्ष्य समजण्याच्या क्षमतेचा लाभ होईल. त्यांचे लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांना गुप्त माहिती मिळण्यास मदत होईल.
पाकिस्तानसोबत चीनचे संबंध अधिक दृढ करणे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी गुंतवणूक, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरशी (सीपीसी) संबंधित सुरक्षेच्या प्रयत्नांचा भाग म्हणून चीनच्या या पावलाकडे पाहिले जात आहे.
होवित्जर तोफा तैनात, लीपा घाटीमध्ये सुरुंगाचे निर्माण एलओसीच्या पार विविध जागांवर चीनच्या १५५ एमएम होवित्जर तोफा तैनात करण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
काशी-मथुराच्या मशिदींवरील दावा मुस्लिमांनी सोडावा!
निक्की हेली यांची ‘त्यांना संपवून टाका’ या संदेशासह इस्रायली क्षेपणास्त्रावर स्वाक्षरी!
शशी थरूर यांच्या सहायकांना विमानतळावर अटक
तरुण अभिनेत्रीचा मल्याळम चित्रपट दिग्दर्शक ओमर लुलू विरुद्ध बलात्काराचा गुन्हा
ही सर्व सुरक्षा सीपीसीच्या आजूबाजूला वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या चौकांवर चिनी लष्कराचे कोणतेही मोठे अधिकारी नव्हते. मात्र इंटरसेप्टर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैनिक व इंजीनीअर भूमिगत बंकरांमध्ये पायाभूत रचना उभारत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील लीपा खोऱ्यातही सुरुंग आहेत. हा सुरुंग काराकोरम राजमार्गाला जोडेल, असे म्हटले जात आहे.
‘नापाक’ मनसुबे हाणून पाडण्यासाठी भारत सज्ज
भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने आधीही गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये चिनी कारवायांवर आक्षेप घेतला आहे. तणाव कायम असल्याने भारत सतर्क असून सीमेपलीडकेडील नापाक मनसुबे हाणून पाडण्यासाठी भारत सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.