कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विजयी, ठाकरेंच्या वैशाली दरेकरांचं खातं बुडीत!

कार्यकर्त्यांकडून जल्लोष

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विजयी, ठाकरेंच्या वैशाली दरेकरांचं खातं बुडीत!

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होत.महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत असली तरी खरी लढत ठाकरे गट वि. शिंदे गट अशी होती.अखेर या जागेवर शिंदे गटाने आपला विजयाचा झेंडा रोवला आहे.शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत.श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे.

कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा श्रीकांत शिंदे यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ठाकरे वि शिंदे असा हा सामना असून दोघांसाठीही ही लढाई प्रतिष्ठेची बनली होती. आज मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच आता ही जागा कोण जिंकतय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. कल्याणचं दोनदा प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा बाजी मारून पुन्हा संसदेत दिसतात की शिवसेनेच्या वैशाली दरेकर त्यांना धक्का देत बाजी पलटवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होत.अखेर जनतेने कौल देत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे याना विजयी केलं आहे.ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे.

हे ही वाचा:

मध्यप्रदेशातून शिवराज सिंह चौहान तब्बल ६ लाखांहून अधिक मतांनी विजयी!

हा निकाल परिवर्तनाला पोषक

उत्तर मुंबईतून भाजपाची मुसंडी, पियुष गोयल विजयी!

सांगलीमध्ये मविआला दणका देत विशाल पाटलांनी उधळला गुलाल

विजय प्राप्त झाल्यानंतर श्रीकांत शिंदेनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, लोकांनी डेव्हलोपमेंटला मतदान दिल आहे.लोकांनी मला निवडून दिल्याबद्दल लोकांचे आभार मानतो. तिसऱ्यांदा निवडणूक दिल्याबद्दल मतदारांचे आभार.लोकं माझ्या आणि मी केलेल्या कामाबरोबर आहेत हे मी पहिल्यापासून बोलत होतो.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरचा विश्वास आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Exit mobile version