सुंदर दिसण्याच्या महत्त्वाकांक्षेने केला श्रीदेवीचा घात?

बोनी कपूर यांनी केला खुलासा

सुंदर दिसण्याच्या महत्त्वाकांक्षेने केला श्रीदेवीचा घात?

श्रीदेवीचे निधन २४ फेब्रुवारी २०१८ रोजी झाले. मात्र ही बातमी जेव्हा आली, तेव्हा त्यावर कोणालाच विश्वास बसला नाही. कारण श्रीदेवी फिट होती, तिला कोणताही आजार नव्हता. त्यामुळे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले गेले. श्रीदेवीचे पती आणि चित्रपटनिर्माते बोनी कपूर यांनी याबाबत खुलासा केला आहे.

“श्रीदेवीला स्वतः शेपमध्ये ठेवण्याची महत्त्वाकांक्षा होती. सुंदर दिसण्याची आवड होती. नेहमी स्वतः शेपमध्येच दिसावे, मग ते ऑफस्क्रीन असो वा ऑनस्क्रीन, असेच तिला वाटत असे. यासाठी ती अनेकदा स्वतःला उपाशी ठेवत असे. ती कधी कधी कठोर डाएटही करत होती. मीठही खात नसे. अपघात झाला, त्यावेळीही ती डाएटवर होती. जेव्हा श्रीदेवीने माझ्याशी लग्न केले, तेव्हाही तिला काही वेळा ब्लॅकआऊटची समस्या होती. तेव्हा तिला डॉक्टरांनी कमी रक्तदाबाची समस्या असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिला त्यांनी मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला होता. सलाडवर हलकेसे मीठ घेतले तरी चालेल, पण नक्की खा, असे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, ती कोणाचेच ऐकत नसे. हॉटेलमध्येही ती बिनामीठ आणि साखरेचे पदार्थ मागवत असे,’ असे बोनी कपूर यांनी सांगितले.

‘तो नैसर्गिक नव्हे तर अपघाती मृत्यू होता. याबाबत माझी चौकशी केली जात होती. त्यामुळे मी सुमारे २४ आणि ४८ तास याबाबत काहीही सांगितले नाही. माझीही अनेक प्रकारे चौकशी झाली. माझी लाय डिटेक्टर टेस्टही झाली. मात्र त्यातून हा केवळ एक अपघात होता, हेच सिद्ध झाले. प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे पोलिसांना असे करावे लागले, असे त्यांनी मला सांगितले,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

आशियाई स्पर्धेत नेपाळला नमवत भारताची उपांत्य फेरीत धडक

नांदेडमधील ३१ तर छ. संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यू

कनोइंग स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह, सुनिल सिंह यांची कांस्य पदकाची कमाई

चिनी फंडींग प्रकरणी ‘न्यूज क्लिक’मधील पत्रकारांच्या घरांवर छापेमारी

श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारावेळी आलेल्या अभिनेते नागार्जुन यांनीही एका प्रसंगाची माहिती बोनी यांना दिली. त्यांच्या एका चित्रपटादरम्यान श्रीदेवी कठोर डाएटवर होती आणि याचप्रकारे बाथरूममध्ये पडली होती. तेव्हा तिचे दात तुटले होते. मात्र त्यांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहिले नाही, असेही बोनी यांनी सांगितले.

Exit mobile version