श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचला आहे. महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच एका संघाच्या विरुद्ध ३०० पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात लंकन टीमने ३०२ धावांचे अशक्य आव्हान लिलया पार केले. श्रीलंकेच्या चमारी अटापटुने १९५ धावांची तुफानी फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला पळो की सळो करून सोडले. तिच्या या आक्रमक खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ३०२ धावांचे लक्ष्य अवघ्या ४४.३ षकांत पूर्ण केले. चमारीने २९ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले.
चमारी अटापटुची ऐतिहासिक खेळी
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकात ३०१ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्टने शानदार शतक झळकावले. लॉरा वोल्वार्टने १४७ चेंडूत १८४ धावांची नाबाद आक्रमक खेळी केली. चमारीच्या शानदार खेळीने दक्षिण आफ्रिकन चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु आफ्रिकन चाहत्यांचा आनंद फार काळ टीकला नाही. चमारीने त्याच्यावर पाणी फेरले. श्रीलंकेने महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठे लक्ष्य गाठले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने जवळपास १० वर्षांपूर्वी २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २८९ धावांचे लक्ष्य गाठले होते, आता श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडलेला आहे.
हेही वाचा :
२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर!
‘मुर्शिदाबाद हिंसाचाराची एनआयए चौकशी करा’!
दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३०१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्टने १४७ चेंडूत १८४ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेसमोर ३०२ धावांचे विक्रमी लक्ष्य होते. श्रीलंकेने ४४.३ षटकांत ४ गडी राखून हे लक्ष्य सहज गाठले. श्रीलंकेकडून चमारीने २९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १९५ धावांची तुफानी खेळी केली.