प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या सहवासामुळे श्रीलंका हे भारतीय हिंदूंसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. श्रीलंकेत अशी अनेक श्रीराम आणि सीता यांच्याशी संबंधित पौराणिक ठिकाण आहेत ज्यावर भारतीयांची गाढ श्रद्धा आहे. हे लक्षात घेऊनच आता श्रीलंका सर्व पौराणिक ठिकाणे पर्यटनाच्यादृष्टीने आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रामायणातील प्रसिद्ध अशोक वाटिकांमध्ये श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांच्याहस्ते ध्यान केंद्राची पायाभरणी करण्यात आली. रामायणातील अशोक वाटिकेचे हे महत्वाचे स्थान मानले जाते.
श्रीलंकेत आजही अशोक वाटिका ही सुंदर बाग आहे. प्राचीन इतिहासानुसार दशानन रावणाची लंका सोन्याची होती. अशोक वाटिका हा त्याचाच एक भाग होता. रामायण काळातील काही पुरावे आजही तेथे आहेत. रामायणात रावणाने माता सीतेला याच वाटिकेत कैद करून ठेवल्याचा उल्लेख आहे. या उद्यानाला अशोकाच्या पवित्र वृक्षाचे नाव देण्यात आले आहे. जे हिंदूंमध्ये पवित्र मानले जाते. याच वाटिकेमध्ये असलेल्या ध्यान केंद्र मंदिरातील सुविधा वाढवण्याचा आणि भारतातून आणि इतर ठिकाणांहून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्याचा श्रीलंक सरकारचा मानस आहे.
नुवारा एलिया या ऐतिहासिक शहराजवळील सीता मंदिरासाठी एक विशेष स्मारक तिकीटही प्रसिद्ध करण्यात आले आहे. नुवारा एलियामध्ये अनेक प्राचीन स्थळे आहेत. येथील रावणाची गुहा खूप प्रसिद्ध आहे. या गुहेत रावणाने तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. रावणाने सीतेलाही येथे बंदिस्त करून ठेवले होते असे मानले जाते. ही गुहा आत बोगद्यासारखी आहे. ही गुहा सोडून एक वाट रावण धबधब्याकडे जाते. गुहेतून बाहेर आल्यानंतर रावण येथे यायचा आणि स्नान करायचा असे म्हटले जाते . रावण धबधब्याजवळ पोहोचणे खूप अवघड आहे. म्हणूनच श्रीलंका सरकारने गुहेच्या मागे आणखी एक धबधबा बांधला असून त्याला रावण धबधबा असे नाव दिले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी
डेथ वॉरंट निघालेय, पण नेमके कोणाचे…?
ठाणे पोलीस आयुक्तांसह एटीएस प्रमुख बनले ‘पोलीस महासंचालक’
भूकंपाच्या धक्क्याने मेघालय हादरले
अशोक वाटिकेच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर एक वेगळी अनुभूती येते. भारतातील लोकांचा या ठिकाणाशी विशेष संबंध आहे. यामुळेच येथे पोहोचणारा प्रत्येक भारतीय स्वत:ला भाग्यवान समजतो. श्रीलंका सरकारने आता अशोक वाटिकेला नवे निसर्गरम्य स्वरूप दिले आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून संपूर्ण परिसराचे आधुनिकीकरण केले आहे. मंदिरापासून ते संपूर्ण परिसर संगमरवरी सुसज्ज करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त असून सीतामातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो विदेशी पर्यटक तेथे पोहोचतात. बागेत प्रवेश विनामूल्य आहे. भाविकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल केले जात नाही.