श्रीलंकेने घेतली भारताची फिरकी

श्रीलंकेने घेतली भारताची फिरकी

श्रीलंका विरुद्ध भारत एक दिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकन संघाने विजय प्राप्त केला आहे. मालिकेतील अखेरचा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याच्या भारतीय समाजाच्या मनसुब्यांना श्रीलंकन गोलंदाजीने सुरुंग लावला. यात श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाज अकिला धनंजय आणि प्रवीण जयविक्रमा या दोघांची कामगिरी महत्त्वाची ठरली.

भारतीय संघाकडून पृथ्वी शॉ (४९) संजू सॅमसन (४६) आणि सूर्यकुमार यादव (४०) या तीन फलंदाजांना व्यतिरिक्त कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. तर दुसरीकडे श्रीलंकेच्या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. विजयासाठी २२६ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावरील आपली पकड मजबूत करून ठेवली होती.

हे ही वाचा:

लडाखमध्ये उभे राहणार केंद्रीय विश्वविद्यालय

तळई येथील दुर्घटनाग्रस्तांना मोदींनी दिला मदतीचा हात

राष्ट्रपती भवन पुन्हा होणार पर्यटकांसाठी खुले

कोल्हापूरला पुराचा पुन्हा वेढा

सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि भानूका राजपक्षे या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने अखेरच्या सामन्यात भारताला धूळ चारली. या संपूर्ण विजयात भारतीय गोलंदाजांनी दिलेल्या तीस अतिरिक्त धावा यादेखील अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. त्यामुळे श्रीलंका संघाने तीन विकेट राखून भारतीय संघावर विजय मिळवला.

या सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघात ५ नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली. हा या खेळाडूंच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा एक टप्पा मानला जात आहे. या पाच खेळाडूंमध्ये नितेश राणा, राहुल चाहर, के.गौथम, संजू सॅमसन आणि चेतन साकारिया यांचा समावेश आहे.

Exit mobile version