भारताविरोधात मनमानी आरोप केल्यानंतर आता कॅनडाच संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. आता श्रीलंकेने भारताला पाठिंबा दिला आहे. काही दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय मिळाला आहे, असा दावा श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी केला आहे. ‘कोणत्याही आरोपाशिवाय काहीही बोलण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांना सवयच लागली आहे. त्यांनी श्रीलंकेबाबतही असेच वक्तव्य केले होते. श्रीलंकेत मोठा नरसंहार झाल्याचे त्यांनी सांगितले होते.
मात्र यात कोणतेही तथ्य नव्हते. अशी कोणतीही घटना श्रीलंकेत झाली नव्हती,’ असे स्पष्टीकरण अली साबरी यांनी दिले.‘मी काल पाहिले की, ट्रुडो हे नाझी लोकांशी संबंधित कोणा एका व्यक्तीचे जोरदार स्वागत करत होते. हे सारे संशयास्पद आहे. आम्हालाही याचा अनभाव आला आहे. ट्रुडो कधीकधी अपमानास्पद आरोप करतात, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हे ही वाचा:
काश्मीरवरील पाकच्या अतिक्रमणाबाबत जीनिव्हामध्ये निदर्शने !
२६/११ हल्ला प्रकरणात चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल, कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोप पत्रात उल्लेख
भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!
पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !
भारतातील श्रीलंकेचे उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांनीही कॅनडाच्या आरोपांवर भारताने दिलेली प्रतिक्रिया कठोर असल्याचे मत व्यक्त केले आहे. या बाबत श्रीलंकेचे भारताला समर्थन आहे. ‘श्रीलंकेच्या लोकांना दहशतवादामुळे नुकसान झाले आहे आणि त्यांचा देश दहशतवादाप्रति शून्य संवेदनशीलता दाखवतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिका म्हणते, कॅनडाने तपास केला पाहिजे
‘खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने तपास पुढे नेऊन गुन्हेगारांना न्यायालयीन चौकटीत आणणे गरजेचे आहे. तसेच, भारत सरकारनेही कॅनडाला तपासात सहकार्य करावे, अशी विनंती आम्ही खासगीपणे आणि सार्वजनिकरीत्याही केली आहे,’ असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.