आसाममधील अमृतपाल सिंगच्या कोठडीत स्पायकॅम पेन, फोन!

तुरुंग कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत सापडल्या वस्तू

आसाममधील अमृतपाल सिंगच्या कोठडीत स्पायकॅम पेन, फोन!

आसाममधील कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या डिब्रुगड मध्यवर्ती तुरुंगात राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एनएसए) अंतर्गत कैदेत असेलल्या वारिस दे पंजाबचा प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कोठडीत स्पायकॅम, फोनसह काही इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी तुरुंग आवारात शोधमोहीम राबवली होती. त्यात स्पायकॅम पेन, सिमकार्डासह स्मार्टफोन, कीपॅड असलेला फोन, कीबोर्डसह असलेला टीव्ही रिमोट पेनड्राइव्ह, ब्लूटूथ हेडफोन्स, स्पीकर्स आणि स्मार्टवॉच आढळले आहे.

तब्बल महिनाभर शोध घेतल्यानंतर कट्टरवादी खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल याला अटक करून २३ एप्रिल २०२३ रोजी डिब्रुगड तुरुंगात ठेवण्यात आले होते. कैद्यांच्या कोठडीत बेकायदा कारवाया सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसए कोठड्यांतील सार्वजनिक जागेवर अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि शोधमोहीम सुरू असल्याचे आसामचे पोलिस महासंचालक जी. पी. सिंग यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘सीता’ सिंहीण आणि ‘अकबर’सिंहाच्या एकत्र राहण्यास विरोध!

गीतकार गुलजार आणि जगद् गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

संदेशखाली अत्याचार प्रकरण; तृणमूल नेत्याला अखेर अटक!

बारामतीत रंगणार पैठणीचा खेळ

‘या अनधिकृत उपकरणांचे स्त्रोत आणि त्यांच्या जोडणीची पद्धत शोधली जात आहे. असे पुन्हा घडू नये, यासाठी पावले उचलली जात आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. डिब्रूगडचे पोलिस अधीक्षक श्वेतांक मिश्रा आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी तेथील सुरक्षा उपायांचे मूल्यांकन करण्यासाठी तुरुंगात दाखल झाले. तिथे त्यांनी कारागृह अधीक्षकांसोबत बैठक घेऊन सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे सांगितले. तुरुंगात अनधिकृत वस्तूंची तस्करी कशी झाली आणि या वस्तू वारीस-दे पंजाब या संघटनेच्या सदस्यांच्या ताब्यात कशा गेल्या, याचा सखोल तपास केला जाणार आहे.

वकील आणि आरोपींच्या कुटुंबीयांना कैद्यांना आठवड्यातून एकदा तुरुंगात भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, डिब्रुगड तुरुंगाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (सुरक्षा) हे पद जानेवारीपासून रिक्त आहे. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर एनएसएअंतर्गत हिंसाचार, गुन्हेगारी कृत्यांचा प्रयत्न, हत्या आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version