स्पुतनिक लस पुढील आठवड्यापासून खुल्या बाजार मिळणार

स्पुतनिक लस पुढील आठवड्यापासून खुल्या बाजार मिळणार

देशांतर्गत उत्पादनाला जुलैपासून प्रारंभ

कोविडच्या दुसऱ्या लाटेशी देश धीराने झुंजत असताना, समस्त भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रशियाची स्पुतनिक ही लस पुढील आठवड्याच्या सुरूवातीपासून दाखल होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

लहान मुलांवरही कोवॅक्सिनची चाचणी

भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

‘सोशल’ दबावामुळे अखेर ‘सोशल’ उधळपट्टीचा निर्णय रद्द

या बाबात अधिक माहिती देताना डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की, या विषाणुविरूद्धची पहिली लस म्हणून ओळखली गेलेली स्पुतनिक ही लस पुढील आठवड्यापासून भारतात खुल्या बाजारात उपलब्ध होणार आहे. हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबॉरेटोरिज हे या लसीचे भारतातील उत्पादन करणार आहेत. डॉ. व्ही के पॉल हे निती आयोगाचे सदस्य देखील आहेत.

स्पुतनिक ५च्या आपात्कालिन वापराला डीसीजीआयने एप्रिल महिन्यात परवानगी दिली होती. भारतातील सध्या कोविड-१९च्या वाढलेल्या प्रभावाकडे पाहून हा निर्णय घेण्यात आला होता. ही भारतातील लसीकरणातील तिसरी लस ठरणार आहे. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या आधारे लसीकरण चालू आहे. ही लस कोविडविरुद्ध ९१ टक्क्यांपर्यंत प्रभावशाली असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

या लसीचे सुमारे साडे सात कोटी डोस भारतात उत्पादित केले जाणार आहेत. सध्या ही लस रशियातून आणली जाणार असली तरीही, या लसीच्या देशांतर्गत उत्पादनाला जुलै महिन्यापासून सुरूवात होणार आहे.

Exit mobile version