30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषस्पुतनिक-व्ही लस मुंबईत कधी? कुठे? किंमत काय?

स्पुतनिक-व्ही लस मुंबईत कधी? कुठे? किंमत काय?

Google News Follow

Related

अपोलो हॉस्पिटल आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीबाबत कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतात दाखल झालेली ही लस आता मोठ्या प्रमाणात भारतीयांना दिली जाणार आहे. भारतात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी दिल्या जातात. त्याचसोबत आता स्पुतनिक व्ही ही लसही दिली जाणार आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात स्पुतनिक व्ही लस अपोलो रुग्णालयामध्ये सोमवारी हैदराबादेत आणि मंगळवारी १८ मे रोजी विशाखापट्टणमध्ये दिली जाईल. रशियाची स्पुतनिक व्ही ही लस ९१.६ टक्के प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. शिवाय या लसीचा कोणताही साईड इफेडॉक्ट नाही. या लसीच्या निरीक्षणानंतर दोन महिन्यांनी म्हणजे एप्रिल महिन्यात आपत्कालिन वापराला भारताने मंजुरी दिली. स्पुतनिक व्ही या लसचे दोन्ही डोस हे एकमेकांपेक्षा वेगळे असतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजने जारी केलेल्या पत्रकानुसार, तूर्तास तरी स्पुतनिक व्ही ही लस प्रायोगिक तत्वावर हैदराबाद आणि विशाखापट्टणम इथेच सुरु केली आहे. त्यानंतर ही लसीकरण मोहीम दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे इथे सुरु करण्यात येईल.

स्पुतनिक व्ही या लसीची भारतातील किंमत जाहीर झाली आहे. त्यानुसार स्पुतनिक व्ही लसीच्या एका डोसची किंमत ९४८ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी म्हणजे ९९५ रुपये इतकी आहे. अपोलो रुग्णालयात स्पुतनिक व्ही या लसीसाठी १२५० रुपये द्यावे लागतील.

अपोलो रुग्णालयाच्या संचालिका संगिता रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरात अपोलो रुग्णालयाकडे १० लाख डोस उपलब्ध होणार आहेत. त्या म्हणाल्या, “आम्हाला आनंद होतोय की अपोलो रुग्णालयाने भारतात उपलब्ध झालेली पहिली विदेशी लस स्पुतनिक व्ही साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजची निवड केली. नागरिकांच्या लसीकरणासाठी आम्हाला महिनाभरात १० लाखांहून अधिक डोस उपलब्ध होतील” असं संगिता रेड्डी म्हणाल्या.

लसीकरणासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीचं तंतोतंत पालन केलं जाईल, असं रेड्डी यांनी म्हटलं. अपोलो रुग्णालयाचे अध्यक्ष हरी प्रसाद म्हणाले, या पायलट प्रोजेक्टच्या निमित्ताने डॉ. रेड्डीज आणि अपोलो व्यवस्थापनाच्या कोल्ड चेन लॉजिस्टिक्सचं परीक्षण करण्यास मदत होईल. आम्हाला विश्वास आहे की स्पुतनिक व्ही लसीसह आम्ही कोव्हिड वॅक्सिनची उपलब्धता आणि वितरण हे सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू.”

स्पुतनिक व्ही ही लस ९१.६ टक्के प्रभावी आहे. ही लस रशियाने बनवली आहे. अमेरिकेत बनलेल्या फायजर आणि मॉडर्ना या लसी ९० टक्के प्रभावी आहेत. मात्र स्पुतनिक व्ही लसीने त्यापुढे मजल मारली आहे.

हे ही वाचा:

कोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन

प्रताप सरनाईकांच्या रिसॉर्टवर इडी आणि सीबीआयचे छापे

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

प्लाझ्मा थेरेपी आता बंद, कारण काय?

भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या लसी उपलब्ध आहेत. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस ८१ टक्के प्रभावी आहे. तर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड ही लस ८० टक्के प्रभावशाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा