मांडवीय म्हणाले, विनेशला ऑलिम्पिकसाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले गेले!

क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत केले निवेदन

मांडवीय म्हणाले, विनेशला ऑलिम्पिकसाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले गेले!

क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी विनेश फोगाटच्या अपात्रतेसंदर्भात लोकसभेत खासदारांना माहिती दिली. ते म्हणाले की, तिच्या अपात्रतेबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला असून त्यासंदर्भात अपील केले आहे. मांडवीय म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुख पी. टी. उषा यांच्याशी बोलले आहेत.

लोकसभेत बोलताना मांडवीय म्हणाले की, फोगाटचे वजन १०० ग्रॅमपेक्षा अधिक असल्यामुळे तिला अपात्र करण्यात आले यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. १०० ग्रॅमपर्यंत हे वजन अधिक असेल तर चालते मात्र त्यापेक्षा हे वजन अधिक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असेही मांडवीय म्हणाले.

मांडवीय म्हणाले की, फोगाट हिला सर्वप्रकारचे सहाय्य केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेले आहे. सर्व प्रकारच्या सुविधा तिला उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा:

बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्तालयातील १९० कर्मचारी मायदेशी परतले

बांगलादेश हिंसाचार; हिंदू गायकाचे घर जाळले, ९७ ठिकाणी हिंदूंवर हल्ले !

“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन

डॉ. दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

मांडवीय म्हणाले की, विनेशला पॅरिस ऑलिम्पिकसाठी ७० लाख ४५ हजार ७७५ रुपयांचे सहाय्य केलेले आहे. स्पेनमधील प्रशिक्षणासाठी तसेच ऑलिम्पिकच्या आधी तयारीसाठीही सरकारने विनेशला मदत केलेली आहे. हंगेरीला गेलेली असतानाही सरकारने तिच्यासाठी सर्वप्रकारचे सहाय्य दिलेले होते. रशियातही आंतरराष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यासाठी तिला मदत करण्यात आली होती.

विनेशने उपांत्य फेरीत विजय मिळवून ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे भारताचे एक पदक निश्चित झाले होते. पण दुर्दैवाने सकाळी वजन करताना तिचे १०० ग्रॅम वजन अधिक भरले आणि तिला अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर देशभरात प्रचंड निराशा व्यक्त केली गेली. यात नेमकी चूक कुणाची याविषयीही चर्चा केली गेली.

 

Exit mobile version