मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या चार दिवसांत राज्यभरातून सुमारे एक लाख ५१ हजारांहून अधिक जेष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे.
राज्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली होती. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यानंतर २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा २६ ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.
हे ही वाचा:
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार
बीसीसीआय म्हणजे ‘क्रिकेट की दुकान’
लालबागच्या राजाच्या दरबारी भाविक, सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी
‘वर्षा’ बंगल्यात बाप्पा विराजमान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली त्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. वयाच्या पंच्चाहत्तरीत कोण एसटीने प्रवास करणार? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला होता. सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची टिंगलटवाळी झाली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाचे चांगले पारिणाम दिसून आले आहेत.