इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवार, २८ मार्च रोजी मोठा अपघात होता होता टाळला. सकाळी दिल्लीहून श्रीनगरला जाणारे स्पाईस जेट कंपनीच्या विमानाला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानातून सुखरूप रवाना करण्यात आले.
स्पाइस जेटचे विमान एसजी १६० हे दिल्लीहून जम्मूच्या दिशेने जाणार होते. पण उड्डाणापूर्वी पुश बॅक दरम्यान विमानाचा उजवा पंख जवळील एका विजेच्या खांबाला धडकला. त्यामुळे विमानाच्या पंखाचे नुकसान झालं. त्यानंतर संबधित विमानाच्या जागी दुसरे विमान मागवण्यात आले आणि त्यातून प्रवाशांना पुढील प्रवासाठी पाठवण्यात आले. दरम्यान या संपूर्ण घटनेचा तपास सुरु आहे.
Spicejet 737-800 damaged after hitting a light pole during pushback at Delhi Airport, India. No injuries reported. pic.twitter.com/el8wRz3RLy
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) March 28, 2022
हे ही वाचा:
‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’
रमापती शास्त्री यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती!
“हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाचो सोपूत घेता की…”
१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान दिल्लीहून ९ वाजून २० मिनिटांनी निघणार होते. मात्र, उड्डाण घेत असतानाच विमानाच्या उजव्या पंखाला खांबाची धडक बसून नुकसान झाले. या घटनेत मोठे नुकसान झाले नसल्याने सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही.