मुंबईहून उड्डाण केलेल्या स्पाईसजेटच्या विमानाला रविवार, १ मे रोजी अपघात झाल्याची दुर्घटना घडली. हे विमान विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत ४० जण जखमी झाले तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई ते दुर्गापूर जाणारे बोईंग B737 SG-945 या स्पाईसजेटच्या विमानाला अपघात झाला. मुंबईहून उड्डाण केलेलं विमान दुर्गापूरच्या विमानतळावर उतरत असताना हा प्रकार घडला. टर्ब्युलन्सची तीव्रता अधिक असल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात ४० जण जखमी झाले आहेत तर १२ प्रवाशांना गंभीर इजा झाली आहे. केबिनमधलं सामान प्रवाशांच्या अंगावर पडल्यामुळे प्रवासी जखमी झाले आहेत.
Today SpiceJet Boeing B737 aircraft operating flight SG-945 from Mumbai to Durgapur encountered severe turbulence during descent which unfortunately resulted in injuries to a few passengers. Immediate medical assistance was provided upon arrival in Durgapur: SpiceJet spokesperson pic.twitter.com/fJyG1ztghc
— ANI (@ANI) May 1, 2022
हे ही वाचा:
पंतप्रधान निघाले जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्सला
“भोंगे काढायला सांगितले तर हातभार फाटली आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली”
४ तारखेपासून ऐकणर नाही…भोंगे उतरले नाहीत, तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा
जमलंच तर तुटून पडाना, भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर, किती तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर
विमान विमानतळावर उतरताच जखमींना वैद्यकीय मदत देण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेबद्दल स्पाईसजेटकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.