25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषफॉर्च्युनर गाडीच्या शर्यतीच्या नादात दांपत्याचा गेला जीव, मुलगा गंभीर जखमी

फॉर्च्युनर गाडीच्या शर्यतीच्या नादात दांपत्याचा गेला जीव, मुलगा गंभीर जखमी

बीसीसीएलमध्ये सर्वेअर म्हणून कार्यरत असणारे राणा दास आणि त्यांची पत्नी मानसी हे गाडीच्या अपघातात मृत्युमुखी

Google News Follow

Related

देशाची कोळशाची राजधानी मानल्या जाणाऱ्या झारखंडमध्ये गाडीच्या अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या आमदार पूर्णिमा नीरज सिंह यांच्या दिराच्या कंपनीच्या नावावर असलेल्या फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत बीसीसीएलमध्ये कार्यरत असणारा इंजिनीअर आणि त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. त्याच्यावर कोलकात्यातील मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना शुक्रवारी १२च्या सुमारास धनबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धैर्या परिसरात झाली. बीसीसीएलमध्ये सर्वेअर म्हणून कार्यरत असणारे राणा दास आणि त्यांची पत्नी मानसी हे गाडीच्या अपघातात मृत्युमुखी पडले. ते त्यांचा मुलगा ऋषभ याला डॉक्टरला दाखवण्यासाठी नेत होते. त्यांची पत्नीही त्यांच्या सोबत होती.

दोन फॉर्च्युनर गाड्यांमध्ये सुरू होती शर्यत

मुलाला डॉक्टरकडे दाखवल्यानंतर हे तिघे घरी परत येत होते. तेव्हा रस्त्यात दोन फॉर्च्युनर गाडीच्या चालकांची एकमेकांशी शर्यत सुरू होती. एक फॉर्च्युनर गाडी मोठ्या वेगात होती. गाडीने दास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे पती-पत्नी कितीतरी अंतरावर फेकले गेले. राणा दास यांचा जागेवरच मृत्यू झाला. मानसी यांना सुरुवातीला एका जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले जात असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर, जबर जखमी झालेल्या ऋषभवर कोलकात्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

शुभमन गिलला ढापला?

कर्जबाजारीपणामुळे पाकिस्तान गार, पण कर्मचाऱ्यांचे वाढले पगार

सतत रडणे,गप्प गप्प राहणे; ओडिशा अपघातातील जखमी मनोविकाराने ग्रस्त

मँचेस्टर सिटी पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगचे विजेते

झारियाच्या आमदाराच्या दिराची गाडी

राणी दास यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, ज्या गाडीने दास यांच्या दुचाकीला धडक दिली, ती गाडी झारिया मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार पूर्णिया नीरज सिंह यांचे दीर हर्ष सिंह यांच्या सिंह नॅचरल्स अँड प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी भाजपच्या नेत्या रागिणी सिंह यादेखील रुग्णालयात पोहोचल्या होत्या. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पूर्णिया यांनी रागिणी यांना पराभूत केले होते. रागिणी यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. या अपघाताप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा