वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आज देशातील अनेक शहरांमधून धावत आहे. आता स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी जोरात सुरू आहे. भारतीय रेल्वे येत्या दोन महिन्यांत ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरू करू शकते असे म्हटले जात आहे. याच दरम्यान, वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी अंतिम टप्प्यात असून चाचणी दरम्यान तब्बल १८० किमी/तास वेगाने वंदे भारत धावली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया ट्वीटरवर ‘वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेन’च्या चाचणीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
नव्या वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनची चाचणी कोटा येथे झाली. यामध्ये ब्रेकिंग सिस्टीम, एअर सस्पेंशन, कप्लर फोर्सची चाचणी घेण्यात आली. चाचणी दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन १८० किमी/तास वेगाने धावली. कोटा रेल्वे विभागातील दिल्ली-मुंबई रेल्वे ट्रॅकवर ३१ डिसेंबरपासून ही चाचणी सुरू झाली असून ती आता अंतिम टप्प्यात आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टेबलवर पाण्याने भरलेला ग्लास ठेवला आहे आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन १७८ च्या वेगाने धावत आहे. हळूहळू ट्रेनचा वेग १८० वर पोहोचतो. विशेष म्हणजे, वंदे भारत स्लीपर ट्रेन १८० चा वेग असूनही टेबलावर ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या ग्लासमधून एक थेंबही पाणी बाहेर पडत नाही.
हे ही वाचा :
मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा
दिल्ली झाली ‘गायब’, धुक्यामुळे दिसेनासे झाले
हिंदू साधू चिन्मय दास प्रकरणाची निष्पक्ष चाचपणी व्हावी
तिरंगा यात्रेतील चंदन गुप्ता हत्याप्रकरणात सर्व २८ आरोपींना जन्मठेप!
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये काय असेल खास?
या ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स, हाय स्पीड वाय-फाय, रीडिंग लाइट्स आणि हाय स्पीड मोबाईल चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सुविधा असतील. ही ट्रेन लवकरच रुळांवर पूर्णपणे उतरवण्यात येणार असून काही मार्गांवर ती धावणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेने सादर केलेली एक अत्याधुनिक आणि आरामदायी ट्रेन आहे, जी लांब पल्ल्याच्या प्रवासाला सोयीस्कर आणि आरामदायी बनवण्याच्या उद्देशाने लवकरच सुरू होणार आहे.
Vande Bharat (Sleeper) testing at 180 kmph pic.twitter.com/ruVaR3NNOt
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) January 2, 2025