काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के करुणाकरन यांची कन्या पद्मजा वेणुगोपाल या काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा बुधवारी (६ मार्च )राजकीय वर्तुळात रंगली होती.भाजप पक्षात प्रवेशावर पद्मजा वेणुगोपाल यांनी एक पोस्ट टाकत या सर्व अफवा असल्याचे बोलले होते.मात्र, नंतर ती पोस्ट गायब झाली.त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आणि याबद्दल तसे काही असेल तर गुरुवारी घोषणा होईल, असेही संकेत देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली.निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते स्वतःचा पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहेत.दरम्यान, केरळचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांची कन्या पद्मजा वेणुगोपाल या देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची अटकळ बांधली जात आहे.
हे ही वाचा :
एडनच्या आखातात येमेनच्या हौती बंडखोरांकडून क्षेपणास्त्रहल्ला; दोघांचा मृत्यू
‘राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय कधीच दिला नाही’
पोलिसभरती पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक!
याबाबत अद्याप कोणतीही माहिती आली नसली तरी त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, केरळमधील पक्षाचे नेते पद्मजा यांना बाजूला सारण्याचे काम करत आहेत, त्यामुळे पद्मजा नाराज आहेत.ते पुढे म्हणाले की, पक्ष करुणाकरन यांचे स्मारक बांधू शकला नाही, जे केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही पक्षाचे प्रतिष्ठित नेते होते. माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या काळात करुणाकरन हे किंग मेकर म्हणून ओळखले जात होते, असे पद्मजा यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पद्मजा सध्या नवी दिल्लीत असून काँग्रेसच्या उमेदवार निवडीत सहभागी होण्यासाठी त्या तेथे गेल्या होत्या.त्या केरळमधील जागेसाठी प्रयत्न करत होत्या.मात्र, त्यांची ही विनंती काँग्रेसने मान्य केली नाही.पण ताज्या वृत्तानुसार, पद्मजा ह्या गुरुवारी नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पोहोचून भाजपचे सदस्यत्व घेतील, अशी माहिती पद्मजा यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली.