पुणे कोविड वाॅर रूमची विशेष व्हाॅट्सॲप सुविधा

पुणे कोविड वाॅर रूमची विशेष व्हाॅट्सॲप सुविधा

पुणे जिल्हा हा देशातील बहुतांश कोरोनाबाधीत रूग्ण असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. अशातच पुणे महापालिकेने कोरोनाशी निगडीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कोरोना रूग्ण आता महापालिकेच्या वाॅर रूमशी व्हाॅट्सॲपद्वारे संपर्क करू शकतात.

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या दुसऱ्या लाटेत दिवसागणिक अनेक जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सुविधांवर ताण पडत आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्हा याला अपवाद नाही. पुण्यात दर दिवशी हजारो लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. या सर्व रूग्णांची सुविधा महानगरपालिकेच्या कोविड वाॅर रूमच्या माध्यमातून केली जाते. या वाॅर रूमशी संपर्क करणे नागरिकांना सोयीचे जावे यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे एक अभिनव कल्पना राबवली जात आहे.

हे ही वाचा:

गरोदर महिलांसाठी महिला आयोगाची विशेष सेवा

बंगालमध्ये भाजपा-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच

राज्यांना त्यांच्या कामगिरीच्या प्रमाणात लसींचे डोस पुरवले जात आहेत

कोव्हॅक्सिन आता ६०० ऐवजी ४०० रुपयांना

हल्ली बहुतांश नागरिक व्हाॅट्सॲप या मेसेजिंग ॲपचा वापर करतात. पुणे महानगरपालिकेने कोविड वाॅर रूमशी संपर्क करण्यासाठी व्हाॅट्सॲप क्रमांक जाहीर केले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती पुणेकरांना दिली यावेळी मोहोळ यांनी हे व्हाॅट्सॲप क्रमांक सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवले. ९०४९२७१२१७ आणि ९०४९२७१०३४ या दोनपैकी एका क्रमांकांवर कोरोना रुग्णांची माहिती पाठवता येणार आहे. त्यानंतर वाॅर रूम मार्फत रुग्णाला संपर्क करण्यात येईल. हा क्रमांक जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवावा असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

Exit mobile version