25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषमहिलांसाठी हा घेण्यात आला 'बेस्ट' निर्णय

महिलांसाठी हा घेण्यात आला ‘बेस्ट’ निर्णय

Google News Follow

Related

लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. परंतु मुंबईतील बेस्ट बससुद्धा मुंबईकरांना अगदी घरपोच सुविधेसाठी उत्तम मानली जाते. आता बेस्टबसमध्ये महिलांसाठी १२ आसने राखून ठेवण्यात आलेली आहेत.

केवळ इतकेच नाही तर, आता बसमध्ये प्रवेश करतानाही महिला प्रवाशांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याकरता वेगळ्या रांगेचा अवलंब करण्यात येणार आहे. सध्याचा घडीला केवळ दक्षिण मुंबईमध्ये एका बस मार्गावर ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली आहे. हा प्रयोग कसा चालतोय यावर आता पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास पुढे आणखी बसमार्गावर अशा पद्धतीने व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली जाणार आहे.

महिलांसाठी बेस्टचा प्रवास हा अनेकदा सोयीचा पडतो. शिवाय घराजवळ बस आगार असेल तर अनेकजणी बेस्टलाच प्राधान्य देतात. त्यामुळेच बेस्टच्या प्रवाशांमध्ये महिलावर्गाची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. गर्दीच्या मार्गावर तसेच मात्र महिलांना अनेकदा धक्काबुक्कीला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आता महिलांच्या रांगा स्वतंत्र असणार आहेत.

 

हे ही वाचा:

भिवंडी अग्निशमन दलात सुधारणांची बोंब; केवळ चारच बंब

महाराष्ट्रात १०५० कोटींचा भ्रष्टाचार

मुकेश अंबानी यांचे ७-इलेव्हन लवकरच मुंबईत

मेक इन इंडिया अंतर्गत होणार ११४ लढाऊ विमानांची खरेदी

 

२०१९ मध्ये बेस्टच्या भाड्यात कपात करण्यात आली आहे. त्यानंतर बेस्ट बस गार्डन मधील प्रवासी संख्या वाढली. सध्याच्या घडीला तर बेस्टमधून, दररोज २७ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करताहेत. यामाध्यमातून दोन कोटी १५ लाख रुपये उत्पन्नाची भर पालिकेच्या तिजोरीत दररोजची जमा होते. मुख्य म्हणजे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बेस्टकडूनही प्रवाशांसाठी जादा बसगाड्या, बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी आता बेस्ट तत्पर झालेली आहे. तसेच प्रवाशांसाठी अन्य नियोजन करण्याचे प्रयोजन बेस्ट प्रशासनमार्फत सुरू करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा