प्रवाशांच्या कमतरतेमुळे अनेक मार्गांवरील गाड्या रद्द
कोरोना संकटामुळे प्रवाशांच्या कमतरतेमुळे एका बाजूला रेल्वेला आपल्या अनेक सेवा रद्द कराव्या लागत आहेत, तर दुसरीकडे उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांतील प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वेला सातत्याने विशेष गाड्या चालवाव्या लागत आहेत. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे मध्य रेल्वेने मुंबईहून बिहारमधील दानापूर येथे जाणारी विशेष रेल्वे चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
हे ही वाचा:
कुख्यात डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू
‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत
मुंबई- दानापूर वन वे सुपरफास्ट स्पेशल
गाडी क्रमांक ०१३५३ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनल, कुर्ला येथून १० मे २०२१ (९ मे आणि १० मेच्या मध्यरात्री) रात्री १२,४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ०५.३५ वाजता दानापूरला पोहोचेल
ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन (मुघलसराय जंक्शन), बक्सर हे थांबे घेणार आहे. या गाडीला सेकंड सिटिंगचे २२ डबे असतील
मुंबई- गोरखपूर वातानुकुलित विशेष
गाडी क्रमांक ०१३५५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनल वरून दिनांक ११ मे २०२१ रोजी संध्याकाळी १६.४० (४.४० वाजता) सुटेल आणि तिसऱ्या दिवशी २.०० वाजता गोरखपूरला पोहोचेल.
परतीला येणारी गाडी क्रमांक ०१३५६ ही गाडी गोरखपूरवरून १३ मे २०२१ रोजी संध्याकाळी १५.४५ (०३.४५ वाजता) निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.५० (०८.५०) वाजता लोकमान्य टिळक टर्मिनलला पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, वाराणसी, मऊ, भटनी या स्थानकांवर थांबेल. या गाडीला १ प्रथम वर्ग वातानुकुलित शयनयान, चार वतानुकुलित २ टायर शयनयान, १३ वातानुकुलित ३ टायर शयनयान आणि एक पँट्री असे एकूण १९ प्रवासी डबे असतील
गाडी क्रमांक ०१३५३ आणि ०१३५५ या गाड्यांमध्ये केवळ आरक्षण असेल तरच चढता येईल. या आरक्षणाला प्रारंभ ८ मे २०२१ पासून होणार आहे. त्यासाठी www.irctc.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.