दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदीरमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आर्थिक अनुदान वितरणप्रसंगी मंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी तब्बल ८९ मराठी चित्रपटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे, सहसंचालक संजय पाटील, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, चित्रपट परीक्षण समितीचे सदस्य अभिजीत साटम, मधुरा वेलणकर, स्वप्निल दिगडे, विनोद सातव, गीतांजली ठाकरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा..
‘हमास’ची क्रूरता उघड; हॅरी पॉटरच्या छोट्या चाहतीचा मृतदेह आढळला!
अखिलेश यादव-कमलनाथ यांच्यातील वाद चिघळला!
महाराष्ट्राच्या सुवर्ण विजेत्याला आता एक कोटी!
‘हमास पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत’
यावेळी मंत्री मुनगंटीवार म्हणाले, प्रथमच २९ कोटी ८५ लाख रुपयांचे ८९ चित्रपट निर्मात्यांना अनुदान देण्यात येत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये विविध प्रकारचे चित्रपट तयार होत आहेत. पात्र चित्रपटांना अनुदान देण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. चित्रपटसृष्टीचा विकास व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत यापुढे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना दुप्पट अनुदान तर चित्रपटाची महिला दिग्दर्शक असेल तर त्यांना पाच लाख रुपये जास्त अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. शिवाय चित्रपटांसोबत डॉक्युमेंटरीसाठीही अनुदान देता येईल का, याची चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या. मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून उत्तुंग भरारी घ्यावी. मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी थिएटरचे परवाने रिन्यू करणार नाहीत त्यांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, चित्रपटाच्या शूटिंगसाठी राज्यात ६५ ठिकाणे उत्तम असून त्यांचा विकास करून शूटिंगला देण्याचा विचार केला जाईल, यामुळे निर्मात्याचे पैसे वाचणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मराठी चित्रपट निर्मात्यांनी केवळ मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे न पाहता त्यातून संस्कार, ज्ञान मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री मुनगंटीवार यांनी केले.