शिवराज्याभिषेक सोहळा यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने विशेष टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवार, ६ जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये या तिकिटाचे अनावरण होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे आमच्यासाठी चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात जना जनानांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
३२ वर्षांपूर्वी केलेल्या हत्येसाठी माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप! काय आहे नेमकं प्रकरण?
बेपत्ता लोकांच्या शोधाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांचे डोळे डबडबले!
‘नासिरुद्दीन यांच्या फार्महाऊसवर पुरस्काराची ट्रॉफी बनली बाथरूमचे हँडल
प्रयागराजमध्ये महिला पोलिसालाच बसला ‘लव्ह जिहाद’चा फटका
तिकीट अनावरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपालांचे सचिव संतोषकुमार उपस्थित राहणार आहेत.