महिलांच्या आयपीएलसाठी तयार झाले एक गीत…

केरळमधील मलाबार महाविद्यालयाने तयार केले हे गाणे

महिलांच्या आयपीएलसाठी तयार झाले एक गीत…

सध्या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची धूम सुरू आहे. पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच महिलादेखील तेवढ्याच त्वेषाने, तडफेने आपले क्रिकेट कौशल्य दाखवत आहेत. महिलांसाठी क्रिकेटचे हे नवे व्यासपीठ सुरू झाल्यामुळे चाहत्यांमध्येही एक नवा उत्साह आहे.

महिलांच्या आयपीएलच्या या पहिल्याच अध्यायाला समर्पित असे एक गाणे केरळमधील मलाबार ख्रिश्चन्स संस्थेच्या इतिहास विभागाने रचले आहे. प्रो. वशिष्ठ यांचे हे गीत आहे. जॅकसन वर्गिस आणि एलिसा यांनी हे गाणे गायले असून हे गाणे या महिला आयपीएलला तसेच जगातील ज्ञात-अज्ञात महिला क्रिकेटर्सना अर्पण करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

तूर्त तरी ध्रुव हेलिकॉप्टरची घरघर थांबली.. जाणून घ्या कारण

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

अनिल परब तो गियो …

जळगाव जिल्हा सहकारी बँकेत राष्ट्रवादीला भोवली फूट

Come lets play again या शब्दांनी या छोट्याशा गीताची सुरुवात केली जाते. ४ ते २६ मार्च या कालावधीत ही स्पर्धा खेळली जात आहे. सहा संघ यात सहभागी झाले आहेत. या महिलांच्या कर्तबगारीचे कौतुक म्हणून हे गीत सादर करण्यात आले आहे. प्रो. वसिष्ठ हे नियमितपणे क्रीडाक्षेत्रातील घडामोडींवर काही उपक्रम राबवून त्याची दखल घेत असतात.

Exit mobile version