गरोदर महिलांसाठी महिला आयोगाची विशेष सेवा

गरोदर महिलांसाठी महिला आयोगाची विशेष सेवा

महिला हक्क आणि महिला प्रश्नांसाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाने देशभरातील गरोदर महिलांसाठी एक विशेष सेवा सुरू केली आहे. महिला आयोगाने गरोदर महिलांसाठी एक व्हाॅट्सॲप क्रमांक सुरू केला आहे. ज्या गरोदर महिलांना आरोग्य सुविधांची आवश्यकता आहे त्या या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

देशात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. देशात दिवसागणिक लाखो रूग्ण कोरोनाच्या कचाट्यात अडकत आहेत. देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर या परिस्थितीने चांगलाच ताण पडत आहे. याचा फटका इतर गरजवंताना पडू नये यासाठी पूरी खबरदारी घेतली जात आहे. अशातच गरोदर महिलांची काळजी वाटून महिला आयोगाकडून पाऊले उचलली गेली आहेत.

हे ही वाचा:

‘डंका’ आता हिंदीतही वाजणार

बंगालमध्ये भाजपा-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच

राज्यांना त्यांच्या कामगिरीच्या प्रमाणात लसींचे डोस पुरवले जात आहेत

कोव्हॅक्सिन आता ६०० ऐवजी ४०० रुपयांना

गरोदर असणाऱ्या महिलांना वैद्यकीय सेवेसाठी महिला आयोगाच्या एका विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे. ९३५४९५४२२४ या व्हाॅट्सॲप क्रमांकावर घरोदर महिला संपर्क करू शकतात. त्यानंतर त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिला आयोगाची ही सेवा दररोज २४ तास उपलब्ध असणार आहे. या सोबतच helpatncw@gmail.com या ईमेलद्वारेही महिला आयोगाशी संपर्क साधता येणार आहे. महिला आयोगाच्या या उपक्रमामुळे देशभरातील गरोदर महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version