‘शेरशाह’ कॅप्टन विक्रम बात्राच्या कुटुंबियांना दिला हा सन्मान

‘शेरशाह’ कॅप्टन विक्रम बात्राच्या कुटुंबियांना दिला हा सन्मान

कारगिल युद्धामधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कॅप्टन विक्रम बात्रा. कॅप्टन विक्रम बात्रा यांची असामान्य कथा ‘शेरशाह’ नावाच्या चित्रपटातून सर्वांसमोर उलगडणार आहे.

‘शेरशाह’च्या कलाकारांनी विशेष अतिथी म्हणून लष्कराचे अधिकारी आणि कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या परिवारासाठी दिल्लीत सिनेमाचे सन्मानपूर्वक विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. ही विशेष स्क्रीनिंग म्हणजे कारगिलच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सगळ्याच भारतीय शूरवीरांना भावनिक श्रद्धांजली ठरली.

विशेष स्क्रीनिंगसाठी वास्तविक जीवनातील ‘शेरशहा’ म्हणजेच कॅप्टन विक्रम बात्रा यांचा जुळा भाऊ विशाल बात्रा, कॅप्टन विक्रम बात्रा यांचे आई- वडील गिरधारीलाल बत्रा आणि कमल कांता बात्रा उपस्थित होते. तसेच लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, लष्कर कर्मचारी अध्यक्ष, लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती, लष्कर कर्मचारी उपाध्यक्ष, लेफ्टनंट जनरल संजीव शर्मा, लष्कर कर्मचारी उपप्रमुख आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते.

हे ही वाचा:

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून

अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

भारतात येणार चार नव्या हवाई कंपन्या?

लष्कराचे अधिकारी आणि बत्रा परिवाराच्या उपस्थितीमुळे हा विशेष स्क्रीनिंग एक सोहळा बनला. प्रमुख भूमिकेत असलेले सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या व्यतिरिक्त दिग्दर्शक विष्णू वर्धन, काश एन्टरटेनमेंटचे निर्माता शब्बीर बॉक्सवाला आणि चित्रपटाचे लेखक संदीप श्रीवास्तवही उपस्थित होते. विष्णू वर्धन दिग्दर्शित या सिनेमात शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकीतीन धीर, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवण चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Exit mobile version