23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेष१२ नोव्हेंबरला उलगडणार हिम्मत सिंगची कथा

१२ नोव्हेंबरला उलगडणार हिम्मत सिंगची कथा

Google News Follow

Related

नोव्हेंबर महिन्याच्या १२ तारखेला स्पेशल ऑप्स या लोकप्रिय वेब सिरीजचा दुसरा सिजन प्रदर्शित होणार आहे. स्पेशल ऑप्स १.५ – द हिम्मत स्टोरी असे नाव या सीझनला देण्यात आले आहे. स्पेशल ऑप्सचा हा नवा सीझन म्हणजे एक प्रकारे प्रिक्वल असणार आहे. या वेब सिरीजच्या पहिल्या सीझन मधून पुढे आलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या हिम्मत सिंग या गुप्तचर अधिकाऱ्याची कथा या नव्या सीझन मधून उलगडली जाणार आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या स्पेशल ऑप्स या सिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता. ही सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच लॉकडाऊन लागल्यामुळे उपलब्ध वेळात लोकांचा कल ही सिरीज बघण्याकडे अधिक दिसून आला होता. के. के. मेनन हा अभिनेता या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसला असून त्याने हिम्मत सिंग या रॉ अधिकाऱ्याची भूमिका वठवली होती.

हे ही वाचा:

जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेने सरकारचीच जमीन सरकारला देऊन तीसपट मोबदला मिळवला!

ट्विटरचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा उघड

‘कॅप्टन’ काढणार स्वतःचा नवा ‘संघ’

गळा चिरला, पाय छाटले…महिला हत्याकांडाने राजस्थान हादरले

तर दिग्दर्शक नीरज पांडे हे आता या मालिकेचा पुढील भाग घेऊन आले असून यात स्वतः हिम्मत सिंग यांची कथा उलगडली जाणार आहे. हिम्मत सिंग हे हिम्मत सिंग कसे बनले त्याचा प्रवास या नव्या सीझन मधून उलगडला जाणार आहे. मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी या सीझनचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून आतापर्यंत तब्बल ६६ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी हे ट्रेलर पाहिले आहे. हा आकडा मिनिटा गणिक वाढताना दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा