टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली. या विजेत्या संघातील खेळाडूंची नावे सरकारी शाळांना देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने १० शाळांची नावे खेळाडूंच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचे शालेय शिक्षण मंत्री विजय इंदर सिंगाला यांनी रविवारी अशी घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनीही मंजुरी दिली आहे.
हे ही वाचा:
का झाला आहे वांद्रे वर्सोवा ‘स्लो’ लिंक?
ज्वेलर हत्याप्रकरणात ते दोन आरोपी सापडले
अरेरे! रक्षाबंधनाच्या दिवशी गर्भवती भगिनीचा खड्ड्यामुळे झाला अपघात
अफगाणिस्तानातून भारतात आलेल्यांना अश्रु झाले अनावर
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हा मिठापूरचा आहे. जालंधरमधील मिठापूर सरकारी शाळेचे नाव आता ऑलिम्पियन मनप्रीतसिंग सरकारी सिनियर सेकेंडरी स्कूल (जीएसएसएस) असे ठेवण्यात आले आहे. भारताकडून सर्वात जास्त सहा गोल करणाऱ्या हरमनप्रीतचे नाव अमृतसरमधील तिमोवाल येथील सरकारी शाळेला देण्यात आले आहे. अमृतसरमधीलच अटारी येथील शाळेला शमशेरसिंगचे नाव देण्यात आले आहे, तर फरीदकोट येथील राजकीय माध्यमिक विद्यालयाला (कन्या) रुपिंदरपाल सिंगचे नाव देण्यात आले आहे.
खलाइहारा येथील प्राथमिक विद्यालयाला गुरजंतसिंग याचे नाव देण्यात आले आहे. चहल येथील कला राजकीय उच्च विद्यालयाला सिमरनजीत सिंह याचे नाव देण्यात आले आहे. खुसेरोपूर येथील माध्यमिक शाळेला हार्दिकसिंग याचे नाव देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांचे नाव ठेवल्यानंतर देशभरात त्याची खूप चर्चा झाली. आता शाळांना खेळाडूंची नावे ठेवल्यानंतर पुन्हा एकदा सर्व स्तरातून त्याचे स्वागत होत आहे.