विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून पंतप्रधान मोदींना खास भेट

विशेष जर्सी नरेंद्र मोदी यांना प्रदान

विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून पंतप्रधान मोदींना खास भेट

भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकपवर नाव नोंदवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बार्बाडोसमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजय प्राप्र्त केला. यानंतर भारतीय संघ विश्वचषकाच्या ट्रॉफीसह गुरुवार, ४ जुलै रोजी मायदेशी परतला. भारतीय संघाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिल्लीत दाखल झालेल्या या संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारतीय संघाने दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी संपूर्ण संघासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. या मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला आहे. खेळाडूंकडून त्यांनी स्पर्धेदरम्यानचे अनुभव ऐकून घेतले तसेच सर्वांचे कौतुक देखील केले. खेळाडूंसोबत त्यांनी फोटो देखील काढले.

दरम्यान, बीसीसीआयच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांना बीसीसीआयने भारतीय संघाची जर्सी भेट म्हणून दिली. विशेष म्हणजे या जर्सीवर ‘नमो’ असे लिहिले आहे. तसेच जर्सीचा क्रमांक १ आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिनी आणि सचिव जय शाह यांनी ही विशेष जर्सी नरेंद्र मोदी यांना सुपूर्द केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला दिलेल्या पाठींब्याबद्दल बीसीसीआयने त्यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा:

ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

भारतीय विश्वविजेत्या शिलेदारांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी २० जणांना अटक

भोले बाबा म्हणतात हाथरसमध्ये समाजकंटकांमुळे झाली चेंगराचेंगरी

दरम्यान भारतीय संघाची विजयी मिरवणूक संध्याकाळी ५ वाजता मरिन ड्राईव्ह येथून निघणार आहे. तर, पुढे वानखेडे स्टेडियमवर विजेत्या संघाचा सत्कार असणार आहे. यासाठी मैदानात मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version