‘हरियाणा जिंकले, आता महाराष्ट्र जिंकायचाय’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

‘हरियाणा जिंकले, आता महाराष्ट्र जिंकायचाय’

Narendra Modi, India's prime minister, speaks at the Bhartiya Janata Party (BJP) headquarters during election results night in New Delhi, India, on Tuesday, June 4, 2024. Modi vowed to continue as India's prime minister even after his party lost its majority in parliament, forcing him to rely on allies to form a government for the first time since he stormed to power a decade ago. Photographer: Prakash Singh/Bloomberg via Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (९ ऑक्टोबर) आभासी पद्धतीने ७,६०० कोटी रुपयांच्या विकासकामाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण करत सरकारकडून राबवलेल्या नव्या योजनांची माहिती दिली. सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी हरियाणातील भाजपच्या विजयाचा उल्लेख करत महाराष्ट्रामध्ये महायुतीला निवडून आणण्याचे आवाहन जनतेला केले. हरियाणा तर भाजपने जिंकली आता महाराष्ट्र जिंकायचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे मंत्री, नेते ऑनलाईन पद्धतीने जोडले गेले होते.

पंतप्रधान मोदी कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी बंधू-भगिनींना माझा नमस्कार. आज महाराष्ट्राला १० मेडिकल कॉलेज मिळाले आहेत. मागील आठवड्यात ठाणे आणि मुंबई मेट्रोसह ३० हजार कोटींच्या प्रोजेक्टचे उद्घाटन केले आहे. अनेक शहरात मेट्रोचा विस्तार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा काही दिवसांपूर्वीच आम्ही दिला. करोडो मराठी माणसांचे दशकांचे स्वप्न पूर्ण झाले. यावरून सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या, आभार मानले. परंतु, हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झाले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा : 

ठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकुट

काँग्रेसचे म्हणजे जिंकता येईना ईव्हीएम वाकडे

धक्कादायक! नौशाद आणि हसन अलीकडून चहात थुंकीचा प्रकार!

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर ठेवल्या ‘सिमेंट स्लीपर’

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचे निकाल समोर आले आहेत, देशाचा मूड काय हे हरियाणाने सांगून टाकले आहे, तिसऱ्यांदा सरकार सलग स्थापन करणे हा एक इतिहास आहे. जनतेला दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून करण्यात आले होते. परंतु, काँग्रेसची सर्व कारनामे उध्वस्त झाली आहेत. दलितांचे आरक्षण काढून आपल्या व्होटबँकसाठी याचा वापर करण्याची काँग्रेसची खेळी दलितांना समजली. त्यामुळे हरियाणाच्या दलित समाजाने भाजपला रेकॉर्डब्रेक समर्थन दिले.

शेतकऱ्यांना, तरुणांना, भडकावण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र, उज्ज्वल भविष्यासाठी या सर्वांनी भाजपावर विश्वास ठेवला. काँग्रेस नेहमी ‘विभागणी करा आणि सत्ता मिळावा’ हेच करत आली आहे, यासाठी नवनवीन युक्त्या आणत आहेत. काँग्रेसचा फॉर्म्युला स्पष्ट आहे, मुस्लिमांना सतत भीती घालायची, त्यांना व्होटबँकेमध्ये कन्व्हर्ट करायचे आणि  व्होटबँकेला मजबूत करायचे.

हिंदू समाजात आग लावण्याचे काम काँग्रेस करत आहे, जेणेकरून त्यावर आपली राजकीय भाकरी भाजता येईल. काँग्रेस द्वेष पसरवणारा सर्वात मोठा कारखाना बनणार आहे, हे गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर ओळखले होते, त्यामुळे गांधीनी काँग्रेसला संपवले पाहिजे असे म्हटले होते. परंतु, काँग्रेस पूर्णपणे संपली नाही, ती आज देशाला संपवण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सर्वांनी सावधान राहून एकजूट होवून भाजपला, महायुतीला मतदान केले पाहिजे. हरियाणा तर भाजपने जिंकली आता महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेला महायुतीला मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले.

Exit mobile version