स्पेनने पार केले क्रोएशियाचे आव्हान

स्पेनने पार केले क्रोएशियाचे आव्हान

सोमवार, २८ जून रोजी पार पडलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात बलाढ्य स्पेनने क्रोएशियाचे आव्हान पार केले आहे. ५-३ अशा अंतिम निकालासह स्पेनने हा सामना आपल्या खिशात टाकला. पण तरीही क्रोएशिया संघाने त्यांना कडवी झुंज दिली.

युरो कप फुटबॉल स्पर्धेचा राऊंड ऑफ १६ चा पाचवा सामना सोमवार, २८ जून रोजी संपन्न झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली असून सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे हा सामना थरारक होता. सामन्याच्या २० व्या मिनिटाला स्पेनचा खेळाडू पेड्री याने स्वयंगोल करत क्रोएशियाचा पदरी एका गोलचे दान टाकले. पण ही आघाडी क्रोएशियाला फार काळ टिकवता आली नाही. ३८ व्या मिनिटाला स्पेनचा खेळाडू पॅब्लो साराबिया याने स्पेनला आघाडी मिळवून दिली. सामन्याचा पहिला हाफ संपला तेव्हा प्रत्येकी एक गोल सह दोन्ही संघ बरोबरीने चालत होते.

हे ही वाचा:

ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा

भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका

बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा

तर सामन्याचा दुसरा हाल्फ सुरू झाला तेव्हा ५७ व्या आणि ७७ व्या मिनिटाला गोल नोंदवत स्पेनने सामन्यात ३-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात स्पेन बाजी मारणार असे वाटत असतानाच अखेरच्‍या अवघ्या काही मिनिटांत गोल करत क्रोएशियाने बरोबरी साधली. क्रोएशियन खेळाडू मिस्लाव ऑर्सिलिच याने ८५ व्या मिनिटाला गोल नोंदवला. तर ९० मिनिटानंतर देण्यात आलेल्या वाढीव मिनिटांमध्ये मारिओ पॅसालीच याने गोल नोंदवत क्रोएशियाला सामन्यात परत आणले. त्यामुळे सामन्याचा ९० मिनिटांचा खेळ संपला तेव्हा दोन्ही संघ तीन गोल करून बरोबरीत होते.

पुढे स्पर्धेच्या नियमानुसार तीस मिनिटांचा अतिरिक्त खेळ खेळला गेला. यात मात्र स्पेनने पूर्णपणे सामन्यावर पकड बनवून ठेवली. स्पेनचा आघाडीचा खेळाडू अलवारो मोराटा याने शंभराव्या मिनीटाला बोल नोंदवत स्पेनला आघाडी मिळवून दिली. तर पुढे १०३ व्या मिनिटाला स्पेन संघाने आपली आघाडी वाढवली. त्यामुळे स्पेन संघाने ५-३ अशा फरकाने हा सामना आपल्या खिशात घातला.

Exit mobile version