युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला शुक्रवार, २ जुलै पासून सुरुवात झाली. शुक्रवारी पार पडलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या या दोन सामन्यांमध्ये स्पेन आणि इटली हे दोन संघ विजयी झाले असून त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
जगातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट आठ संघ हे उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. यापैकी स्पेन विरुद्ध स्वित्झर्लंड आणि बेल्जियम विरुद्ध इटली हे दोन सामने शुक्रवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार अनुक्रमे ९.३० वाजता आणि १२.३० वाजता खेळवले गेले. स्पेन विरुद्ध स्वित्झर्लंड या पहिल्या सामन्यामध्ये स्पेनचा संघ हा स्वित्झर्लंडपेक्षा मजबूत समजला जात होता. पण स्वित्झर्लंडने उत्कृष्ट बचावात्मक खेळाचा नमुना दाखवत स्पेनची दाणादाण उडवली.
हे ही वाचा:
दिनो मोरिया मुंबई महापालिकेतील सचिन वाझे
अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स
खरंतर सामन्याच्या आठव्या मिनिटालाच स्पेन संघाने गोल करत सामन्यात आघाडी घेतली. पण नियमांनुसार हा गोल स्वयंगोल म्हणून जाहीर केला गेला. पुढे मोजून ६० मिनिटे स्पेनने आपली ही आघाडी टिकवून ठेवली. पण ६८ व्या मिनिटाला स्वित्झर्लंड संघाचा कर्णधार शकिरी याने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. शाकिरीच्या या गोलमुळे सामन्याची नियोजित ९० मिनिटे संपली तेव्हा सामन्याचा निकाल १-१ होता. त्यामुळे ३० मिनिटांचा वाढीव वेळ दिला गेला.
या वेळात स्पेन संघ हा खूपच आक्रमक दिसला. स्वित्झर्लंड संघाच्या रेमो फ्र्युलर या खेळाडूला सामन्याच्या दुसऱ्या हाल्फमध्येच पंचानी रेड कार्ड दाखवत सामन्यातून निलंबित केल्यामुळे स्वित्झर्लंडची टीम अडचणीत आली होती. पण स्पेनिश संघ आणि उपांत्य फेरी यांच्यात एखाद्य भिंतीसारखा उभा होता स्विस गोलकिपर यान सॉमर. सॉमर हा कालच्या सामन्याचा निर्विवाद हिरो ठरला. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत त्यांनी स्पेनच्या आक्रमणांना रोखून धरले.
पुढे सामना जेव्हा पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला तेव्हादेखील सॉमर याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. पण तरीही त्यांच्या संघाच्या वाट्याला अपयशच आले.पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना जिंकत स्पेनने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.