वैज्ञानिक नंबीनारायण म्हणतात, काँग्रेसकाळात अंतराळ संशोधनाचे झाले हाल!

माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांनी काँग्रेसकाळातील इस्रोचे हाल केले विशद

वैज्ञानिक नंबीनारायण म्हणतात, काँग्रेसकाळात अंतराळ संशोधनाचे झाले हाल!

चांद्रयान- ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. या दरम्यान भाजपने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांचा आहे. यामध्ये नंबी हे काँग्रेसच्या शासनकाळातील कामाची माहिती देत आहेत. काँग्रेसकाळात अंतराळसंशोधनाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते, असे नंबी म्हणत आहेत. या व्हिडीओवरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

‘काँग्रेसकाळात अंतराळसंशोधनासाठी फारसे पैसे दिले गेले नाहीत. त्या वेळी इस्रोजवळ कोणतीही जीप किंवा गाडी नव्हती तर बस होती, जी कामाच्या पाळ्यांनुसार फिरत असे,’ असे नंबी या व्हिडीओत सांगत आहेत. त्यावर ‘मोदी यांनी इस्रोसाठी आर्थिक तरतूद केली आणि वैज्ञानिकांसोबत उभेही राहिले. त्याचाच परिणाम म्हणून आज भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात इथपर्यंत प्रगती करू शकला आहे, ’ अशी प्रतिक्रिया हा व्हिडीओ शेअर करून भाजपाने ‘एक्स’वर दिली आहे.

हे ही वाचा:

सांगलीमधील आश्रमशाळेतील १७० मुलांना विषबाधा

भारताच्या पुरुष ऍथलेटिक्स संघाने विक्रमी वेगाने अंतिम फेरीत मारली धडक

ऑनलाइन काम करणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणले!

भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही मात्र मध्येच अडकलोय…पाकिस्तान टीव्हीवर चर्चा

नंबी नारायण हे माजी वैज्ञानिक आहेत. त्यांच्यावर अभिनेता आर. माधवन यांनी ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नंबी नारायणन यांना हेरगिरी करण्यावरून अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची नुकतीच सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली. लिक्विड फ्युएल रॉकेट टेक्नॉलॉजी आणण्यात नंबी यांचे योगदान आहे. सन १९७० मध्ये त्यांनी हे काम केले होते. याचा वापर इस्रोने त्यांच्या विविध रॉकेटमध्ये केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या चांद्रयान ३ मोहिमेचे श्रेय घेत आहेत, असा विरोधक दावा करतात यावर नंबीनारायण म्हणाले की, चांद्रयान ३ सारख्या मोहिमेचे श्रेय कुणाला द्यायला हवे जर ते पंतप्रधानांना द्यायचे नसेल तर? जेव्हा तुम्ही एखादा राष्ट्रीय स्तरावरची योजना आखता तेव्हा त्याचे श्रेय पंतप्रधानांनाच द्यावे लागेल. तुम्हाला कदाचित पंतप्रधान आवडत नसतील पण ती तुमची समस्या आहे.

नंबी  नारायण यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, इस्रोसारख्या संस्थेतील लोकांना नियमित वेतन मिळत नाही असा दावा केला जातो. त्यावर ते म्हणाले की, वेतन किंवा पेन्शनसाठी कोणताही विलंब झाल्याचे दिसलेले नाही. माझे पेन्शन प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला मला मिळते.

Exit mobile version