उत्तर प्रदेश बलात्कार प्रकरणात सामील असलेला राजू हा हिंदू नव्हे तर मुस्लिम…पोलिसांकडून स्पष्टीकरण

समाजवादी पक्षाच्या आयपी सिंग यांचा दावा खोटा

उत्तर प्रदेश बलात्कार प्रकरणात सामील असलेला राजू हा हिंदू नव्हे तर मुस्लिम…पोलिसांकडून स्पष्टीकरण

अयोध्येत एका मागासवर्गीय मुलीवर समाजवादी पक्षाचा नेता मोईद खान आणि त्याचा सहकारी यांनी बलात्कार केल्याचे प्रकरण चर्चेत असताना तो सहकारी हिंदू असल्याचा दावा केला जात होता. राजू नावाच्या त्या युवकाचे त्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात होते. त्या माध्यमातून मोईद खानवरील आरोप सौम्य करण्याचा प्रयत्नही सुरू होता. पण  पोलिसांनी सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या समर्थकांनी सदर हिंदू व्यक्तीचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते, या खोट्या दाव्याचे खंडन केले आहे. आझमगडचे माजी राज्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांना उत्तर देताना अयोध्या पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोन्ही आरोपी मोईद खान आणि राजू खान यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. वैज्ञानिक पुरावे संकलनाच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

एक्सवरील एका पोस्टमध्ये, आयपी सिंग यांनी मोईद खानच्या कुटुंबातील सदस्यांचा एक व्हिडिओ मीडियाला दिला. त्यांनी लिहिले आहे की, आम्ही सर्वजण डीएनए चाचणी घेण्याचा आग्रह का करत आहोत कारण राजूचे त्या मुलीशी प्रेमसंबंध होते आणि राजू हिंदू आहे. [तो] बेकरीमध्ये [मोईद खानच्या मालकीचा] काम करायचा. भाजपच्या नेत्यांनी ७२ वर्षीय बेकरी मालक मुस्लिम असल्यामुळे त्याला जबरदस्तीने या प्रकरणात ओढले. आज योगी सरकार खोट्या रचलेल्या प्रकरणावर राजकारण करत आहे. उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन मुलीची सुरक्षा वाढवावी. तिला एम्समध्ये हलवायला हवे.
व्हिडिओमध्ये मोईद खानच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की त्यांची बाजू ऐकण्यासाठी कोणीही आले नाही.

हेही वाचा..

भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी !

मुस्लीम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने दिली ॲसिड हल्ल्याची धमकी

गिरणा नदीत अडकलेल्या १२ तरुणांना हेलिकॉप्टरने केलं रेस्क्यू !

कलम-३७० हटवून आज ५ वर्षे पूर्ण, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक !

बुरखा घातलेल्या एका महिलेने सांगितले की, मुलीचे राजूसोबत प्रेमसंबंध होते, असे बोलले जात आहे. तो २० वर्षांचा आहे. मी दोन मुलांना जन्म दिला. मी वयाच्या १६ व्या वर्षी [पहिल्यांदा] आई झाले. मुलगी दोन महिन्यांची गरोदर होती, तर तिच्या आईला कसे कळले नाही? तिने पुढे असा दावा केला की राजूने पोलिसांना सांगितले की या प्रकरणात मोईदची कोणतीही भूमिका नाही. परंतु कोणीही त्याचे ऐकत नाही. पुढे तिने मुलीच्या कुटुंबावर पैसा आणि राजकारणाच्या प्रभावाखाली खोटे बोलल्याचा आरोप केला.

कुटुंबातील आणखी एका सदस्याने सांगितले की, या प्रकरणात राजकारण होत आहे कारण हे कुटुंब समाजवादी पक्षाशी जोडलेले आहे. कारण मोईद खान यांना वर्षभरापूर्वी शहरप्रमुख केले गेले होते. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्यांनी राजूचे पूर्ण नाव वापरले नाही किंवा तो हिंदू असल्याचे थेट ठामपणे सांगितले. केवळ आयपी सिंगच नाही तर इतर एक्स वापरकर्ते आणि समाजवादी पक्षाच्या समर्थकांनीही मोईद खानला वाचवण्यासाठी हाच प्रकार केला आहे.

हे सगळे व्हीडिओ सादर करून सदर राजू नावाचा इसम हा हिंदू होता असे भासविण्याचा प्रयत्न झाला, पण प्रत्यक्षात तो राजू खान असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मोईद खान आणि राजू खान या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version