सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर बुलडोजर, पायऱ्या तोडल्या!

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर बुलडोजर, पायऱ्या तोडल्या!

उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरावर शुक्रवारी (२० डिसेंबर)  बुलडोझरची कारवाई करण्यात आली. घराबाहेरील नाल्यावर बेकायदा अतिक्रमण करून स्लॅब टाकण्यात आला होता, त्यावर कारवाई करून जेसीबी मशिनच्या सहाय्याने तो हटवण्यात आला आहे.

संभलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या पथकाकडून अवैध अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत अनेक घरांबाहेरील अवैध अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने आज सपा खासदारांच्या घरावरही कारवाई करण्यात आली आणि त्यांच्या घरासमोरील स्लॅब बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.

संभलचे एएसपी श्रीश चंद यांनी सांगितले की, संभलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शुक्रवारची नमाज असल्या कारणाने मंदिर आणि मशिदीभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आजूबाजूच्या परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. ड्रोनच्या साह्याने घरांच्या छतावर नजर ठेवली जात आहे.

हे ही वाचा : 

कल्याणमधील मराठी माणसावर हल्ला प्रकरणी अखिलेश शुक्ला निलंबित

तलवारीचा नंगानाच करत धमकावणाऱ्या फजल आणि समीरला पोलिसांनी ठोकले!

सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

वऱ्हाड घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात पलटली; पाच जणांचा मृत्यू

दरम्यान, संभलमधील मशिद सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारला झियाउर रहमान बर्क जबाबदार धरले आहे. लोकांना उकसवल्यामुळे हिंसाचार घडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच दरम्यान, ‘वीज चोरी’ प्रकरणी देखील त्यांच्यावर कडक करण्यात येत आहे. वीज विभागाने बर्क यांना नोटीस पाठवून १ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Exit mobile version