28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषपंतप्रधान मोदींवर टिप्पणी करणाऱ्या सपा नेता हाजी रझाच्या तीन मजली इमारतीवर बुलडोजर...

पंतप्रधान मोदींवर टिप्पणी करणाऱ्या सपा नेता हाजी रझाच्या तीन मजली इमारतीवर बुलडोजर !

कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील फतेहपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे सपा नेता हाजी रझा यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने मंगळवारी (२७ ऑगस्ट) फतेहपुर शहरातील बकरगंज या ठिकाणी बांधकाम सुरु असलेल्या तीन माजली इमारतीवर बुलडोजर चालवून कारवाई केली आहे. यावेळी  मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करून कारवाई करण्यात आली.

बकरगंजमध्ये सोमवारी मोठा पोलीस फौजफाटा तैनात झाल्याने एकच खळबळ उडाली होती. एसडीएम सदर प्रदीप रमण, सुशील कुमार दुबे महसूल अधिकाऱ्यांसह आज सकाळी घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाने दोन बुलडोजर घेवून पाणी मोहल्ला येथील रहिवासी सपा नेते हाजी रझा यांच्या इमारतीवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

एसडीएम सदर प्रदीप रमण यांनी सांगितले की, कारवाई करण्यात आलेली इमारत ही हाजी रझा यांच्यासह अन्य दोन लोकांच्या नावावर आहे.चुकीच्या ठिकाणी, नियमांविरुद्ध बांधल्याने इमारतीवर तोडक कारवाई करण्यात येत आहे.

हे ही वाचा :

एक लाखाहून अधिक गोविंदांना विम्याचे सुरक्षा कवच

दोन लाख श्रीगणेश निघाले परदेशाला

अयोध्येत ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी सलमानच्या मुसक्या आवळल्या !

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तिघांचा मृत्यू, सुमारे २०,००० लोक स्थलांतरित !

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सपा उमेदवार नरेश उत्तम पटेल हे विजयी झाले होते. त्यांच्या विजयानिमित्त सुलतानपूर घोष येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्षांचे पुत्र आणि सपा नेते हाजी रझा यांनी नरेश उत्तम पटेल यांच्या विजयाच्या जल्लोषात पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या  प्रकरणी भाजपच्या एका स्थानिक नेत्याने हाजी रझा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.  दरम्यान, हाजी रझा यांच्या विरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा