दक्षिण-पश्चिम मान्सून येत्या ३१मेच्या सुमारास केरळ पोहोचेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी ही माहिती दिली. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या आणि टंचाईने त्रस्त झालेल्या भारतीयांना दिलासा मिळणार आहे. ‘दक्षिण-पश्चिम मान्सून ३१ मेच्या सुमारास केरळ पोहोचेल, असा अंदाज आहे. ही वेळ लवकरची नाही. सर्वसाधारपणे याच तारखेच्या आसपास मान्सून येथे पोहोचतो. केरळमध्ये मान्सूनची सुरुवात सर्वसाधारपणे १ जून रोजी होते,’ अशी माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी बुधवारी दिली.
गेल्या १० वर्षांतील आकडेवारीनुसार, गेल्या १५० वर्षांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या तारखांमध्ये मोठे बदल झाले आहेत. केरळमध्ये सन १९१८ मध्ये मान्सून सर्वांत लवकर म्हणजे ११ मे रोजी दाखल झाला होता, तर १९७२ मध्ये तो सर्वाधिक उशिरा म्हणजे १८ जून रोजी दाखल झाला होता.
हे ही वाचा:
“सरकार आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचं व्हिजन तयार”
उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे काय?
‘वीर सावरकरांची निंदा करणाऱ्यांना नकली शिवसेनेकडून डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम’
राहुल गांधी यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ!
केरळमध्ये गेल्या वर्षी ८ जून रोजी, २०२२मध्ये २९ मे रोजी, २०२१मध्ये ३ जून रोजी आणि २०२०मध्ये १ जून रोजी मान्सूनची सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी भारतीय हवामान विभागाने जून ते सप्टेंबरपर्यंत सुरू झालेल्या दक्षिण-पश्चिम मान्सून दरम्यान सामान्यहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. जून आणि जुलै महिने कृषी विभागासाठी सर्वांत महत्त्वाचे मान्सून महिने मानले जातात. याच कालावधीत सर्वाधिक खरिफ पिकांचे उत्पादन होते. भारताच्या कृषी क्षेत्राचा ५२ टक्के भाग मान्सूनवर अवलंबून आहे. देशातील अनेक भागांना एप्रिलमध्ये भीषण उष्म्याचा सामना करावा लागला. अनेक राज्यांत तापमानाचे विक्रम मोडले. काही भागांत दुष्काळाचाही सामना करावा लागतो आहे.