अभिनेत्री रेवती म्हणाली, ‘आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत, हे पहिल्यांदाच मोठ्याने बोललो’

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

अभिनेत्री रेवती म्हणाली, ‘आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत, हे पहिल्यांदाच मोठ्याने बोललो’

अभिनेत्री रेवती आशा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे वर्णन अविस्मरणीय दिवस असे केले असून रामलल्लाच्या येण्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल झाल्याची पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पाहिल्यानंतर रेवती यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी रामलल्लाचे चेहरा पाहून वेगळ्याच भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, हिंदूंनी त्यांच्या विश्वासाला नेहमीच कमी महत्त्व दिले. मात्र प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अनेक जण पहिल्यांदा आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत, असे मोठ्याने बोलले, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

भरधाव ट्रकची ऑटो रिक्षाला धडक, १२ जणांचा मृत्यू!

कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!

इंडी आघाडीला मैत्रीपूर्ण “खंजीरा”चा महामंत्र

उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!

‘कालचा दिवस अविस्मरणीय होता. रामलल्लाचा मोहक चेहरा पाहिल्यावर माझ्यात काहीतरी भावना निर्माण झाली. हे विचित्र आहे की हिंदू म्हणून जन्माला आल्यावर आपण आपल्या श्रद्धा स्वतःपुरत्याच ठेवतो, इतरांच्या श्रद्धा दुखावण्याचा प्रयत्न करू नये, म्हणून आपण आपले महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतो… धर्मनिरपेक्ष भारत हाच आपल्याला प्रकर्षाने जाणवतो आणि आपली धार्मिक श्रद्धा वैयक्तिक ठेवतो. हे सर्वांसाठी असेच असावे. श्रीरामाच्या घरवापसीने खरोखरच अनेकांच्या गोष्टी बदलल्या आहेत… आम्ही मोठ्याने बोलू शकलो, कदाचित पहिल्यांदाच बोलू शकलो की, हो आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत!!! जय श्री राम,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. अभिनेता नित्या मेननने रेवतीच्या विचारांशी सहमती दर्शवली आणि हात जोडून आणि हृदयाच्या इमोजीसह ‘खूप खरे’ अशी टिप्पणी केली आहे.

२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडल्यानंतर देशभरात हिंदू समुदायात प्रचंड आनंदाचे वातावरण होते. अनेक अभिनेते या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्याकडूनही या सोहळ्याचे खूप कौतुक झाले.

Exit mobile version