कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेते पुनीत राजकुमार यांचे आज (२९ ऑक्टोबर) निधन झाले. पुनीत हे जीममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या अभिनेत्याने वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर कर्नाटकात शोककळा पसरली असून तेथील सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. शहरातील काही भागांमध्ये १४४ लागू करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आधी त्यांना छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, हा हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. पुनीत राजकुमार यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.
हे ही वाचा:
त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही
एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण
रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’
पंतप्रधान मोदी जाणार देवभूमीत! बाबा केदारनाथचे घेणार आशीर्वाद
त्यांनी २९ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीततील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
पुनीत राजकुमार हे कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहेत. पुनीत हे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अप्पू’ या चित्रपटामुळे ते प्रसिद्धी झोतात आले. त्याने आतापर्यंत कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.