ऋषभ पंत याने संपूर्णपणे फिट होऊन यंदाच्या आयपीएलमध्ये परतणे हे यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. दिल्लीच्या या कर्णधाराने ४३ चेंडूंत ८८ धावा तडकवून मोठी खेळी केली. त्यात पाच चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता.
पंतने अक्सर पटेलच्या सोबतीने सावध सुरुवात केली. अक्सरने ३७ चेंडूंत ५० धावा केल्या. त्यानंतर पंतनेही धुवांधार फंलदाजी केली. त्याने १६व्या षटकात मोहित शर्मा याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्याने मोहितला हेलिकॉप्टर शॉट लगावून सर्व उपस्थितांना चेन्नईचा विकेटकीपर एम. एस. धोनीची आठवण करून दिली. पंतचा हा शॉट बघून दिल्लीचा मेंटॉर सौरव गांगुली यांनाही राहवले नाही. पंतचा शॉट बघून गांगुली लगेचच उभे राहिले आणि त्यांनी पंतचे कौतुक केले.
हे ही वाचा:
जनता दलाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या!
‘डीआरडीओ’ने बनविले भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’
रेल्वेच्या जनरल डब्यातील प्रवाशांचा जेवणाचा प्रश्न मिटला, अवघ्या २० रुपयांत मिळणार जेवण!
पंत याने १८ व्या षटकात ३४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने मोहितच्या चौथ्या चेंडूवर षटकार लगावला. नंतर, ट्रस्टन स्टब्सने साई किशोरच्या १९व्या षटकात दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यानंतर २०व्या षटकात पुन्हा पंतने मोहितचा धुव्वा उडवला. पंतने या षटकात एक षटकार, एक चौकार आणि लागोपाठ तीन षटकार खेचून ३१ धावा केल्या. दिल्लीने चार बाद २२४ धावा केल्या. त्यांनी गुजरातवर चार धावांनी विजय मिळवून गुणतक्त्यात चौथा क्रमांक कायम ठेवला आहे.