‘दादा’ लवकरच रुपेरी पडद्यावर

‘दादा’ लवकरच रुपेरी पडद्यावर

भारतीय क्रिकेटमधला ‘दादा’ अर्थात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावर एक सिनेमा येणार आहे. महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव यांच्यानंतर सौरव गांगुलीचा क्रिकेटर म्हणून प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे. स्वत: सौरव गांगुली यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. सौरव गांगुलीच्या करिअरवर आधारित हा चित्रपट असणार आहे. लव फिल्मसद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

सौरव गांगुलीचे मैदानावरील वावरणे अगदी अंग्री यंग मॅनसारखे होते. त्यामुळे त्याच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. याबद्दल बोलताना गागुंलीने रणबीर कपूरचे नाव जाहिर केले आहे. तसेच आणखी दोन हिरोंबाबतही विचार होत असल्याचं त्याने सांगितंल. या चित्रपटात गांगुलीची संपूर्ण क्रिकेट कारकिर्द अगदी पदार्पणापासून ते आता बीसीसीआय अध्यक्ष होण्यापर्यंत दाखवण्यात येणार आहे.

लव फिल्मसने आतापर्यंत ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘दे दे प्यार दे’ आणि ‘छलांग’ सारखे चित्रपटांची निर्मिती केली आहे. लव फिल्मसच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे.

हे ही वाचा:

खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी

बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम

ऐन गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी

आज मोदी ब्रिक्स परिषदेला संबोधणार

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बायोपिक सुपरहिट ठरली होती. या चित्रपटात धोनीची भूमिका दिवंगत सुशांतसिंग राजपूत यांने साकारली होती. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवरही बायोपिक आली होती ज्यात इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर देखील बायोपिक आहे. या सिनेमाचे नाव ‘८३’ आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आहेत. मात्र हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही.

Exit mobile version